-
आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कोलकात्यासमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
हे लक्ष्य कोलकाता संघाने रिंकू सिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर सात गडी गमावून लक्ष्य गाठले. गुजरातचा या स्पर्धेतील हा पहिलाच पराभव आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
शेवटच्या चेंडूवर गुजरात टायटन्सच्या (जीटी) जबड्यातून विजय हिसकावणाऱ्या रिंकू सिंगची कहाणी तुम्हाला रडवू शकते. पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला रिंकू कधी कधी झाडूही मारायचा. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
पैशांच्या कमतरतेचा सामना करत असतानाही त्याने क्रिकेटर होण्याचे स्वप्न सोडले नाही. आता त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी (KKR) सामना जिंकणारी कामगिरी केली आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
१२ ऑक्टोबर १९९७ रोजी अलिगढ, यूपी येथे जन्मलेल्या रिंकू सिंगचा क्रिकेट प्रवास इतका सोपा नव्हता. रिंकू सिंग पाच भावंडांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
त्याचे वडील गॅस सिलिंडर वितरणाचे काम करायचे. अशा स्थितीत कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रिंकूची क्रिकेटर बनण्याची स्वप्न धुळीस मिळू लागले होते. आयपीएलमध्ये निवड झाल्याने सुधारणा झाली. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
हताश झालेल्या रिंकू सिंगने एके दिवशी नोकरी मिळवण्याचा निर्णय घेतला, पण फारसे शिकलेला नसल्यामुळे रिंकूला झाडू मारण्याचे काम मिळत होते. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
यानंतर रिंकू सिंगने पूर्णपणे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीत खेळल्या गेलेल्या स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीजमध्ये बाईक मिळाली, ती त्याने वडिलांना दिली. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
गुजरातचा संघ सहज सामना जिंकेल असे सर्वांना वाटत असताना, त्यावेळी रिंकू सिंगने १९व्या षटकातील शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार आणि षटकार खेचून कोलकात्याच्या आशा जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
यानंतर, २० व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर उमेश यादवने १धाव घेत रिंकूला स्ट्राइक दिली. रिंकूने दुसऱ्या चेंडूवर लाँग ऑफ आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर षटकार खेचून सामना रोमांचक केला. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
त्यानंतर रिंकूने लाँग ऑफच्या चौथ्या चेंडूला आणि पाचव्या चेंडूला लाँग ऑनला षटकार देऊन सामना पूर्णपणे कोलकात्याच्या दिशेने वळवला. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
शेवटच्या चेंडूवर केकेआरला विजयासाठी ४ धावांची गरज होती आणि हा चेंडू षटकारापर्यंत पोहोचवत संघाला रोमहर्षक विजय मिळवून देण्याचे काम रिंकू सिंगने केले. (फोटो सौजन्य -ट्विटर)

वेश्याव्यवसायातून महिलेची १५ वर्षांनी झाली सुटका, घरी पोहोचताच कुटुंबियांनी…