-
यंदाचं आयपीएलचं हंगाम जोरदार सुरू आहे. या IPL 2023 मध्ये असे अनेक सामने झाले ज्यामध्ये खेळाडूंचे प्रदर्शन पाहून प्रेक्षकही थक्क झाले.
-
आयपीएल २०२३ च्या १३ व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने गुजरात टायटन्सचा तीन विकेट्सने पराभव करून रोमांचक विजय नोंदवला.
-
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुजरातने कोलकात्यासमोर २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य कोलकाता संघाने रिंकू सिंगच्या वादळी खेळीच्या जोरावर सात गडी गमावून लक्ष्य गाठले.
-
आज आपण आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या सात गुणसंख्येवर नजर टाकुया.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने २०१३ मध्ये पुणे वॉरियर्सविरुद्ध २६३ धावा केल्या होत्या. त्या सामन्यात ख्रिस गेलने अवघ्या ६६ चेंडूत १७५ धावांची तुफानी खेळी केली होती.
-
२०१६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात टायटन्सविरुद्ध ३ विकेट गमावून २४८ धावा केल्या होत्या. विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनीही त्या सामन्यात शतके झळकावली.
-
चेन्नई सुपर किंग्जने २०१० मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध २४६ धावा केल्या होत्या. या सामन्यात मुरली विजयने ५६ चेंडूत १२७ धावा केल्या.
-
२०१८ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध २४५ धावा केल्या होत्या. या सामन्याचा हिरो सुनील नरेनने ३६ चेंडूत ७५ धावा केल्या.
-
२०१८ मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना माईक हसीने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध केवळ ५४ चेंडूत ११६ धावा केल्या होत्या. या सामन्यात चेन्नईने २४० धावा केल्या.
-
२०१५ मध्ये, विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सच्या धडाकेबाज खेळीमुळे, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने मुंबई इंडियन्सविरुद्ध एक गडी गमावून २३५ धावा केल्या होत्या.
-
२०२१ मध्ये इशान किशनने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध ३२ चेंडूत ८४ धावा केल्या होत्या. त्यावेळी मुंबई इंडियन्सने २३५ धावा केल्या.
-
(सर्व फोटो: आयपीएल)
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…