-
इंडियन प्रीमियर लीगच्या १६व्या हंगामाची सुरुवात ३१ मार्च रोजी गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळची आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यापासून सुरुवात झाली. १० संघांसह आयपीएलचा हा दुसरा हंगाम आहे. गेल्या वर्षी लीगमध्ये दोन नवीन संघ सामील झाल्यानंतर त्याची उत्कंठा वाढली आहे. अशा परिस्थितीत आयपीएलने तीन वर्षानंतर जुन्या होम आणि अवे फॉरमॅटसह पुनरागमन केले आहे.
-
-
आयपीएल २०२३च्या पॉइंट टेबलवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. १६व्या हंगामात राजस्थान रॉयल्सने चार सामने खेळले आहेत ज्यात तीन जिंकले आहेत आणि एक पराभव झाला आहे. संजू सॅमसनचा संघ ६ गुणांसह आणि चांगल्या नेट रनरेटसह पहिल्या क्रमांकावर आहे.
-
लखनऊ सुपर जायंट्सचेही ४ सामन्यांत ६ गुण झाले असून ते दुसऱ्या क्रमांकावर आहेत. के.एल.राहुलसमोर ही विजयी घौडदौड पुढे चालू ठेवण्यासाठी विरोधी संघाविरोधात मोठे प्लान आखले आहेत. गौतम गंभीर आणि संपूर्ण संघ व्यवस्थापन कशाप्रकारे रणनीती हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
-
मोहाली येथे झालेल्या या रोमांचक सामन्यात गुजरातने पंजाबवर एक चेंडू शिल्लक असताना विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना पंजाबने ८ बाद १५३ धावा केल्या. गुजरातने विजयासाठी दिलेले १५४ धावांचे लक्ष्य १९.५ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. आयपीएलच्या १६व्या मोसमातील गुजरात टायटन्सचा हा तिसरा विजय ठरला. या विजयानंतर गुणतालिकेत गुजरात टायटन्सची स्थिती सुधारली आहे. हार्दिक पांड्याचा संघ ६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
किंग खानची टीम सध्या खूप फॉर्ममध्ये आहे. रिंकू सिंगने मारलेल्या एकाच षटकातील पाच षटकारामुळे संघातील वातावरण हे प्रसन्न आहे. तीनपैकी दोन सामने जिंकून ४ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
-
माहीची चेन्नई मागील सामन्यात राजस्थान विरुद्ध फक्त ३ धावांनी पराभूत झाली होती. चारपैकी दोन सामने जिंकून ४ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. ऋतुराज सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे.
-
आयपीएल२०२३च्या १८व्या सामन्यात गुजरात टायटन्सने पंजाब किंग्जचा ६ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पंजाब किंग्जने गुजरातसमोर विजयासाठी १५४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे गुजरातने एक चेंडू आणि ६ विकेट्स शिल्लक असताना पूर्ण केले. या सामन्यानंतर पंजाब चारपैकी दोन सामने जिंकून ४ गुणांसह सहाव्या स्थानावर असून चेन्नईपेक्षा त्यांचा रनरेट कमी आहे.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू २ गुणांसह सातव्या स्थानावर आहे. सध्या बंगळुरूला आगामी सामने चांगल्या सरासरी धावगतीने जिंकणे आवश्यक आहेत. विराट कोहली आणि संपूर्ण संघ फॉर्ममध्ये असून लय मात्र प्राप्त झालेली नाही.
-
दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यानंतर, पॉइंट टेबल मधील लीगमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सने त्यांचे खाते उघडले आहे. सलग दोन पराभवांनंतर अखेर मुंबईने तिसरा सामना जिंकला, तर दिल्ली कॅपिटल्सचे खाते अजूनही उघडलेले नाही आणि संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
-
सनरायझर्स हैदराबाद २ गुणांसह नवव्या क्रमांकावर आहे. त्यांनी तीन सामन्यांत फक्त एकच सामना जिंकला आहे. एडन माक्ररम हा संघाचा कर्णधार असून त्याला प्लेईंग ११चा ताळमेळ बसवण्यात थोडी अडचण येत आहे असे आतापर्यतच्या निर्णयावरून दिसते.
-
या हंगामात आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स हा एकमेव संघ आहे, ज्याचे खाते चार सामन्यांनंतरही उघडलेले नाही. दिल्लीला सलग चार पराभवांना सामोरे जावे लागले आहे. दिल्ली तळाच्या १०व्या क्रमांकावर आहे. अपघातामुळे ऋषभ पंत या आयपीएलमध्ये खेळत नसून त्याची उणीव संघाला जाणवत आहे.
-
आयपीएलच्या गेल्या १५ वर्षांच्या इतिहासात कोणत्याही संघाला १२ पेक्षा कमी गुणांसह प्लेऑफ फेरी गाठता आलेली नाही. आयपीएल १६ मध्ये मागील हंगामाप्रमाणेच संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. सर्व संघ ७ होम आणि ७ अवे सामन्यांच्या धर्तीवर एकूण १४-१४ सामने खेळतील. संघ त्यांच्या गटातील संघांसह ८ सामने आणि इतर गटासह ६ सामने खेळतील.
Amol Kolhe: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या शेवटाबाबत अमोल कोल्हे यांचे धक्कादायक विधान; शरद पवारांच्या सूचनेबाबत म्हणाले…