-
शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात हैदराबाद संघाने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो म्हणजे १३.२५कोटींचा हॅरी ब्रुक. त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडत आयपीएल २०२३ चे पहिले शतक ठोकले आहे. ५५ चेंडूत १०० धावा करत तो नाबाद राहिला.
-
हॅरी ब्रुकने केलेले आयपीएल २०२३ या हंगामातील पहिले शतक ठरले असून आतापर्यंतच्या सामन्यात कुठल्याही संघाच्या एकाही फलंदाजाला शतक करता आलेले नाही. तसेच, त्याने केलेले शतक हे आयपीएल इतिहासातील पहिल्या १० वेगवान शतकांमध्ये देखील येत नाही.
-
तुम्ही हे नाव नंतर या यादीत पुन्हा वाचालच. एकेकाळचा विस्फोटक कॅरेबियन फलंदाज ख्रिस गेलने वेगवान शतक झळकावले आहे. २०११ मध्ये आरसीबीकडून खेळताना त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब विरुद्ध केवळ ४६ चेंडूत १०० धावा केल्या होत्या.
-
भारताचा माजी सलामीवीर फलंदाज मुरली विजयची ४६ चेंडूत १०० धावांची खेळी या यादीत नवव्या स्थानावर आहे. आयपीएल २०१० मध्ये राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने हे शतक केले.
-
पंजाब किंग्सकडून खेळताना, मयंक अग्रवालने २०२० मध्ये फक्त ४५ चेंडूंत आयपीएल मधील शानदार शतक झळकावले. शतकांच्या यादीत तो आठव्या स्थानावर आहे.
-
श्रीलंकेच्या महान फलंदाजांपैकी एक, सनथ जयसूर्याने मुंबई इंडियन्सकडून खेळताना चेन्नई विरुद्ध ४५ चेंडूत १०० धावा केल्या. त्याचे हे दमदार शतक या यादीत सातव्या स्थानावर येते.
-
२०१७ मध्ये जेव्हा डेव्हिड वॉर्नरने कोलकाता विरुद्ध फक्त ४३ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले तेव्हा तो सनरायजर्स हैदराबादचा कर्णधार होता. आता तो दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधारम्हणून खेळत आहे.
-
सूर्यकुमार यादवच्या आधी ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या एबी डिव्हिलियर्सने आयपीएल २०१६ मध्ये गुजरात लायन्स विरुद्ध ४३ चेंडूत १०० धावा केल्या होत्या. या यादीत तो पाचव्या स्थानावर आहे.
-
जगाने पाहिलेल्या गोलंदाजांसाठी सर्वात धोकादायक सलामीवीरांपैकी एक अॅडम गिलख्रिस्ट. २००८ मध्ये डेक्कन चार्जर्सकडून मुंबई इंडियन्सविरुद्ध ४२ चेंडूत १०० धावा अप्रतिम शतक झळकावले होते. गिलख्रिस्ट या एलिट शतकांच्या चोथ्या स्थानावर बसला आहे.
-
२०१३ मध्ये, डेव्हिड मिलरने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून बंगळुरूविरुद्ध ३८ चेंडूत १०० धावा केल्याबद्दल त्याला ‘किलर मिलर’ अशी ओळख मिळाली. तो या शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.
-
युसूफ पठाण आयपीएल २०१० च्या राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यामधील सामन्यात त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी केली होती. त्याने ३७ चेंडूत अफतातून शतक झळकावले.
-
ख्रिस गेलने आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद शतकाची नोंद केली आहे. बंगळुरूमध्ये पुणे वॉरियर्स विरुद्ध फक्त ३० चेंडूत वादळी शतक ठोकले. या डावात त्याने नाबाद १७५ धावांची खेळी केली होती, ही आयपीएलमधील आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट; भारताला विजयासाठी किती धावांची गरज?