-
रविवारी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू व्यंकटेश अय्यरने शानदार शतक झळकावले. या खेळाडूने ५१ चेंडूत १०४ धावांची खेळी केली. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ९ षटकार मारले. त्याचबरोबर तो आयपीएल २०२३ मध्ये शतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
पण व्यंकटेश अय्यर यांचा प्रवास तुम्हाला माहीत आहे का? खरे तर व्यंकटेश अय्यरची कथा बॉलिवूड चित्रपटापेक्षा कमी नाही. व्यंकटेश अय्यर हा क्रिकेटपटू होण्यापूर्वी सीए होता, पण नंतर या खेळाडूने सीएपेक्षा क्रिकेट खेळणे पसंत केले. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
वास्तविक व्यंकटेश अय्यरने आईच्या सांगण्यावरून सीए सोडले. यानंतर तो क्रिकेट मैदानाकडे वळला. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
व्यंकटेश अय्यरच्या शतकानंतरही केकेआरला मुंबईविरुद्ध पराभूत व्हावे लागले. या सामन्यात केकेआरने मुंबईला १८६ धावांचे लक्ष्य दिले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
आयपीएल संघ कोलकाता नाइट रायडर्सने व्यंकटेश अय्यरची प्रतिभा ओळखली. यानंतर शाहरुख खानची टीम केकेआरमध्ये व्यंकटेश अय्यर सामील झाला. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
ज्यामध्ये व्यंकटेश अय्यरच्या ५८ चेंडूतील १०४ धावांच्या खेळीचा समावेश होता. त्याच्या संघातील इतर खेळाडू फक्त ८१ धावा करु शकले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
१८६ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबईने १७.४ षटकात लक्ष्य गाठले. त्यामुळे व्यंकटेश अय्यरची शतकी खेळी व्यर्थ ठरली. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
आयपीएलशिवाय व्यंकटेश अय्यर भारतीय संघाकडूनही खेळला आहे. व्यंकटेश अय्यरने १९ जानेवारी २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पण केले. या खेळाडूने २१ जानेवारी २०२१ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. (फोटो सौजन्य-ट्विटर)

रीलसाठी थेट रेल्वे रुळावर झोपली! तेवढ्यात भरधाव वेगात ट्रेन आली अन्…, VIDEO पाहून बसेल धक्का