-
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर त्याच्या आयपीएलमधील कामगिरीमुळे चर्चेत आहे.
-
अर्जुन तेंडुलकरने रविवारी(१६ एप्रिल) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलं.
-
दोन वर्ष मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये बसून असलेल्या अर्जुन तेंडुलकरला पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सच्या अंतिम ११ जणांच्या संघात स्थान मिळालं.
-
या सामन्यात त्याने पहिल्याच षटकात गोलंदाजी करत केवळ चार धाव्या दिल्या.
-
मुंबई इंडियन्सविरुद्ध सनरायझर्स हैदराबाद या मंगळावारी (१८ एप्रिल) झालेल्या सामन्यात अर्जुनला पहिली विकेट मिळाली.
-
अर्जुनने सनरायझर्स हैदराबादच्या भुवनेश्वर कुमारला झेलबाद केलं.
-
या सामन्यात त्याने २.५ षटकांत १८ धाव्या दिल्या.
-
अर्जुनला पहिली विकेट मिळाल्यानंतर सचिन तेंडुलकर व सारा तेंडुलकरचा आनंद गगनात मावेनासा झाला.
-
साराने इन्स्टाग्रामवर अर्जुनसाठी खास पोस्ट शेअर करत “या दिवसासाठी खूप वेळ वाट पाहिली. मला तुझा खूप अभिमान वाटतो,” असं म्हटलं.
-
तर सचिन तेंडुलकरने “अखेर तेंडुलकरकडे आयपीएल विकेट आहे,” असं ट्वीट केलं होतं.
-
मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरची आयपीएल सॅलरी जाणून घेऊया.
-
अर्जुन तेंडुलकरला २०२१ मध्ये मुंबई इंडियन्सने २० लाख रुपये या रकमेवर खरेदी केलं होतं.
-
२०२२ मध्ये झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सने अर्जुनवर २५ लाखांची बोली लावली होती.
-
त्यानंतर मुंबई इंडियन्सने त्याला २०२३मधील आयपीएलसाठी ३० लाख रुपये इतक्या किंमतीत पुन्हा खरेदी (रिटेन) केलं.
-
(सर्व फोटो : अर्जुन तेंडुलकर/ इन्स्टाग्राम)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”