-
मोहालीच्या बिंद्रा स्टेडियममध्ये आयपीएलचा २७ वा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि पंजाब किंग्ज यांच्यात होत आहे. पंजाब किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
विराट-फाफच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आरसीबीने २० षटकांत १७४ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जच्या फलंदाजांची आरसीबीच्या गोलंदाजांनी पुरती दाणादाण केली. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
विराट कोहली ५९ धावा करून बाद झाला. विराटने ४७ चेंडूत ५ चौकार आणि १ षटकार ठोकून ५९ धावांची खेळी साकारली.(एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
आरसीबीचे सलामीवीर फलंदाज विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी करत पंजाबच्या गोलंदाजांचा अक्षरक्षा धुव्वा उडवला. विराट आणि फाफने चौफेर फटकेबाजी करत अर्धशतकी खेळी केली. दोन्ही फलंदाजांनी आयपीएल २०२३ मध्ये चौथं अर्धशतक ठोकलं. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
सलामीला मैदानात उतरलेला अथर्व तायडे स्वस्तात माघारी परतला. मोहम्मद सिराजने ४ धावांवर असताना अथर्वला बाद केलं. त्यानंतर प्रभसिमरन सिंगने सावध खेळी करत ३० चेंडूत ४६ धावांची खेळी साकारली. परंतु त्यालाही पार्नेलने क्लीन बोल्ड केलं अन् पंजाबला दुसरा धक्का बसला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान प्रेक्षकांनी या सामन्याचा मनमुराद आनंद लुटला. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पंजाबच्या चार फलंदाजांना बाद करून आरसीबीला विजयाच्या दिशेनं नेलं.(एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
डामॅथ्यू शॉर्ट आणि लियाम लिविंगस्टनलाही धावांचा सूर गवसला नाही. हरप्रीत सिंग भाटीया आणि सॅम करनही स्वस्तात माघारी परतले. परंतु, पंजाब किंग्जचा विकेटकीपर जितेश शर्माने आक्रमक खेळी केली. आरसीबीसाठी मोहम्मद सिराजने ४ विकेट घेतल्या.. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
पंजाबकडून फिरकीपटू राहुल चाहरने चार षटकांत २४ धावा दिल्या. पण राहुलला एकही विकेट मिळवण्यात यश आलं नाही. सॅम करनच्या गोलंदाजीवर फाफ ६८ धावांवर खेळत असताना उंच झेल उडाला होता. परंतु, पंजाबचा विकेटकीपर जितेश शर्माने झेल सोडला आणि फाफला जीवदान मिळालं. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील आयपीएल सामन्यादरम्यान प्रीती झिंटाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पंजाब जरी हरला असला तरी देखील प्रेक्षकांची उपस्थिती प्रशंसनीय होती. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)
-
मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये पंजाब किंग्ज आणि आरसीबी यांच्यातील सामन्यानंतर विराट कोहलीसोबत प्रीती झिंटा बोलताना दिसली. यावेळी त्याच्यात मजेशीर गप्पा देखील झाल्या. (एक्सप्रेस फोटो कमलेश्वर सिंग)

मुलींनी अक्षरश: मर्यादाच ओलांडली! शाळेच्या गणवेशात हद्दच पार केली, VIDEO पाहून बसेल धक्का