-
आयपीएलच्या १६व्या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेला सलामीवीर डेव्हॉन कॉनवेची बॅट जोरदार तळपत आहे. कॉनवेने या मोसमात आतापर्यंत ४०० हून अधिक धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
चेन्नई सुपर किंग्ज संघाचा भाग असलेल्या डेव्हॉन कॉनवेचा फॉर्म खूपच प्रभावी आहे, ज्यामध्ये त्याने आतापर्यंत ९ डावात ५९.१४च्या सरासरीने ४१४ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेचा इथपर्यंतचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. जेव्हा तो दक्षिण आफ्रिका सोडून न्यूझीलंडला गेला, तेव्हा त्याने आपली सर्व मालमत्ता विकली. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेला न्यूझीलंड संघात स्थान मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागली, त्यानंतर त्याला अखेर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेची पत्नी किम वॉटसनने त्याला न्यूझीलंडला जाऊन क्रिकेट करिअर करण्याचा सल्ला दिला होता, त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
वर्ष २०२२ मध्ये डेव्हॉन कॉनवेने किम वॉटसनला दीर्घकाळ डेट केल्यानंतर एका खाजगी समारंभात लग्न केले. किम वॉटसन क्वचितच स्टँडमध्ये कॉनवेला चीअर करताना दिसते. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेने आतापर्यंत न्यूझीलंड संघासाठी १६ कसोटी, १८ एकदिवसीय आणि ३८ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
कॉनवेने आयपीएलमध्ये आतापर्यंत १६ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने ४६० धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)
-
डेव्हॉन कॉनवेने आयपीएलमध्ये आतापर्यंत ८ अर्धशतकं झळकावली आहेत. ज्यामध्ये नाबाद ९२ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे. (फोटो सौजन्य-इन्स्टाग्राम)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट; भारताला विजयासाठी किती धावांची गरज?