-
भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाने क्रिकेटनंतर आता नवी इनिंग सुरू केली आहे.
-
सुरेशने युरोपमध्ये स्वतःचं एक रेस्टॉरंट उघडलं आहे. (स्रोत: @sureshraina3/instagram)
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याने अलीकडेच नेदरलँड्सची राजधानी अॅमस्टरडॅममध्ये भारतीय रेस्टॉरंट उघडले. (स्रोत: @sureshraina.addicts/instagram)
-
या रेस्टॉरंटचे काही फोटो क्रिकेटरने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
-
या फोटोंमध्ये तो स्वतः स्वयंपाक करताना दिसत आहे. (स्रोत: @sureshraina3/instagram)
-
एका फोटोत तो गुलाब जामुन बनवताना दिसत आहे, तर दुसऱ्या चित्रात तो भाजी बनवताना दिसतोय. (स्रोत: @sureshraina3/instagram)
-
त्याने आपल्या रेस्टॉरंटचे नाव स्वतःच्या अडनावावर ठेवले. (स्रोत: @sureshraina.addicts/instagram)
-
रैनाने आपल्या स्टाफबरोबरचा एक फोटोही शेअर केला आहे.
-
त्याच्या नवीन रेस्टॉरंटचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (स्रोत: @sureshraina3/instagram)
-
सुरेश रैना अनेकदा त्यांच्या घराच्या स्वयंपाकघरात चांगले पदार्थ बनवताना दिसतो.
-
आता तो त्याचे पाककौशल्य आणि भारतातील स्वादिष्ट पदार्थ युरोपियन लोकांपर्यंत नेण्याच्या मोहिमेवर आहे. (स्रोत: @sureshraina.addicts/instagram)
-
रैना त्याची पत्नी प्रियांका रैनासोबत अॅमस्टरडॅममध्ये राहतो. त्यांची मुलगी ग्रेशिया आणि मुलगा रिओही तिथे शिकतात. (स्रोत: @priyankacraina/instagram)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख