-
विराट कोहली आपल्या ५०० व्या आंतरराष्ट्रीय सामन्या एक मोठा विक्रम केला आहे. विराच ५०० व्या सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने त्याच्या कसोटी कारकीर्दीतले २९वे शतक झकावले. यासह त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सर डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाशी शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
५०० व्या कसोटीपर्यंत सर्वाधिक शतके ठोकण्याच्या बाबतीत कोहलीने सचिनला मागे टाकले. सचिनने ५०० सामन्यांमध्ये ७५ शतके ठोकली होती. तर कोहलीने ७६ शतके झळकावली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
विराट कोहली या शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. विराट कोहलीच्या अगोदर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शतकांचे महाशतक झळकवले आहे. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील १२वे शतक झळकावले आणि जॅक कॅलिसची बरोबरी केली. कॅलिसने या संघाविरुद्ध १२ शतके झळकावली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
विराट कोहली विदेशात सर्वाधिक ४६ शतके झळकावणारा जगातील दुसरा फलंदाज ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर सचिन तेंडुलकर असून त्याने ५८ शतकं केली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
आशिया खंडाच्या बाहेर सर्वाधिक कसोटी शतके करणारा विराट कोहली (१३) तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर सचिन तेंडुलकर (१८) आणि सुनील गावसकरने (१५) सर्वाधिक शतकं केली आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
कसोटीत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना विराट कोहलीने आपले २५ वे शतक झळकावले. त्याने या क्रमांकावर कसोटीत एकूण २४ शतके झळकावणाऱ्या ब्रायन लाराला मागे टाकले. (फोटो सौजन्य -ट्विटर)
-
फॅब ४ मध्ये सर्वाधिक कसोटी शतकांच्या बाबतीत कोहलीने केन विल्यमसनला (२८) मागे टाकले आहे. या बाबतीत स्टीव्ह स्मिथ (३२) जो रूट (३०) आणि विराट कोहली (२९) शतकांसह अनुक्रमे टॉप-३ मध्ये आहेत. (फोटो सौजन्य -ट्विटर)

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट; भारताला विजयासाठी किती धावांची गरज?