-
सर्वात प्रथम ५०० वा आंतराष्ट्रीय सामना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने २००६ साली खेळला होता. त्याने आपल्या ५००व्या सामन्यात (वनडे) ३५ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
सनथ जयसूर्या हा ५०० वा आंतराष्ट्रीय सामना खेळणारा जगातील दुसरा खेळाडू आहे. जयसूर्याने २००७ मध्ये आपल्या ५००व्या सामन्यात (वनडे) एक धाव काढून बाद झाला होता. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग ५०० वा आंतराष्ट्रीय सामना खेळणारा तिसरा खेळाडू आहे. त्याने हा सामना (वनडे) २०१०मध्ये खेळताना त्यात ४४ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
द वॉल नावाने प्रसिद्ध असलेल्या राहुल द्रविडने २०११ मध्ये आपला ५०० वा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. तो हा कारनामा करणारा चौथा खेळाडू असून त्याने या सामन्यात (वनडे) फक्त दोन धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
महेला जयवर्धने २०११ मध्ये आपला ५००वा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने या सामन्यात (टी-२०) ११ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू जॅक कॅलिसने आपला ५००वा आंतराष्ट्रीय सामना (टी-२०) २०१२मध्ये खेळताना दोन धावा केल्या होत्या. तो जगातील सहावा फलंदाज आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
डावखुरा कुमार संगकारा ५००वा आंतराष्ट्रीय सामना खेळणारा सातवा खेळाडू आहे. त्याने २०१३ मध्ये ५००व्या सामन्यात (वनडे) ४८ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
शाहिद आफ्रिदीने २०१५ मध्ये ५००वा आंतराष्ट्रीय सामना खेळणारा आठवा फलंदाज आहे. त्याने ५००व्या सामन्यात (वनडे) २२ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने २०१८ साली आपला ५००वा आंतराष्ट्रीय सामना खेळला होता. आपल्या या टी-२० सामन्यात त्याने ३२ धावा केल्या होत्या. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने २०२३ मध्ये आपला ५००वा आंतराष्ट्रीय सामना खेळला. तो हा पराक्रम करणारा जगातील १०वा फलंदाज आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)
-
विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध हा कसोटी सामना खेळला ज्यामध्ये त्याने २०६ चेंडू १२१ धावा केल्या. तो ५००व्या सामन्यात शतक झळकावणारा जगातील पहिला खेळाडू आहे. (फोटो सौजन्य- इंडियन एक्सप्रेस)

३० दिवसानंतर शनी देणार नुसता पैसा; ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींना मिळणार गडगंज श्रीमंतीचे सुख