-
भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील तिसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८३ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादवने ४९ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमार यादवने रोहित शर्माला मागे टाकत ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादवच्या नावावर आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१ सामन्यांत १०१ षटकार आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमारला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये रोहित शर्मापेक्षा अधिक सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत. सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२व्यांदा सामनावीराचा किताब जिंकला आणि रोहित शर्माला (११) मागे टाकले. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकत चौथे स्थान पटकावले. शिखर धवनने १७५९ धावा केल्या आहे, तर सूर्यकुमार यादवच्या १७८० धावा आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमार आता प्रोव्हिडन्समधील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने महेला जयवर्धनेला (८१) मागे टाकले आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमार यादव सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील नंबर वन फलंदाज आहे. त्याने ५१ टी-२० सामन्यांच्या ४९ डावांमध्ये १७८० धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
त्याची वनडेत आतापर्यंतची कामगिरी फारशी खास झालेली नाही. सूर्याने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांच्या २४ डावात ५११ धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)
-
सूर्यकुमार यादवने आतापर्यंत एकमेव कसोटी सामना खेळला आहे. त्यामध्ये सूर्याने ८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”