-
एन. जगदीसन लिस्ट ए करिअरमध्ये पहिल्या क्रमांकावर असून त्याने २०२२ साली अरुणाचल प्रदेशविरुद्ध सर्वाधिक २७७ धावा केल्या आहेत. सौजन्य- (ट्वीटर)
-
या यादीत शिखर धवन दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने साऊथ आफ्रिका अ संघाविरुद्ध २०१३ साली २४८ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
पृथ्वी शॉचे या यादीत दोनवेळा नाव लागते. नुकत्याच सॉमरसेटविरुद्ध ठोकलेल्या खणखणीत द्विशतकाचा (२४४) समावेश होतो. याआधी पृथ्वीने पॉन्डीचेरी विरुद्ध २०२१ मध्ये नाबाद २२७ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
चौथ्या क्रमांकावर ऋतुराज गायकवाड असून त्याने २०२२ मध्ये उत्तरप्रदेशविरुद्ध नाबाद २२० धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
पाचव्या क्रमांकावर संजू सॅमसन असून त्याने २०१९ मध्ये गोव्याविरुद्ध नाबाद २१२ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
सहाव्या क्रमांकावर यशस्वी जैस्वाल असून त्याने २०१९ मध्ये झारखंडविरुद्ध २०३ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
कर्ण कौशलने २०१८ साली सिक्कीमविरुद्ध २०२ धावा केल्या होत्या सध्या तो सातव्या क्रमांकावर आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
समर्थ व्यासने २०२२ साली मणिपूरविरुद्ध २०० धावा केल्या होत्या सध्या तो आठव्या क्रमांकावर आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०२३ मध्ये होणारा विश्वचषक लक्षात घेता या यादीतील शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड, संजू सॅमसन आणि यशस्वी जैस्वाल हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत मात्र यापैकी नेमकी कोणाला संधी मिळणार हे येणारा काळच ठरवेल. सौजन्य- (ट्वीटर)
२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य