-
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची आतापर्यंतची कारकीर्द चांगली आहे. मैदानावरील दमदार कामगिरीसोबतच त्याने भरपूर कमाईही केली आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
एका रिपोर्टनुसार, रोहितची एकूण संपत्ती २०० कोटींच्या पुढे गेली आहे. त्यांच्याकडे ३० कोटींचे घर आहे. यासोबतच अनेक महागड्या वाहनांचाही कार कलेक्शनमध्ये समावेश करण्यात आला आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
एका मासिकाच्या माहितीनुसार, रोहितची एकूण संपत्ती २१४ कोटी रुपये आहे. त्याच्याकडे ४ बीएचके फ्लॅट वरळी येथे आहे आणि त्याची किंमत सुमारे ३० कोटी रुपये आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
रोहितचे दुसरे घर लोणावळ्यात होते. पण अहवालानुसार त्याची विक्री झाली आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
रोहितकडे जवळपास ६ ते ७ कोटी रुपयांची वाहने आहेत. यामध्ये लॅम्बोर्गिनी, मर्सिडीज बेंझ, बीएमडब्ल्यू आणि टोयोटा कारचा समावेश आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
रोहितने काही कंपन्यांमध्ये गुंतवणूकही केली आहे. यासोबतच नुकतीच क्रिकेट अकादमीही सुरू करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
रोहितच्या पगाराबद्दल बोलायचे झाले, तर ते करोडोंमध्ये आहे. बीसीसीआय त्याला टीम इंडियासाठी खेळण्यासाठी दरवर्षी ७ कोटी रुपये देते. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
त्याच वेळी, एक वनडे खेळण्यासाठी ६ लाख रुपये आणि एक कसोटी सामना खेळण्यासाठी १५ लाख रुपये मिळतात. रोहितला आयपीएलमधूनही मोठी रक्कम मिळते. (फोटो सौजन्य- रोहित शर्मा इन्स्टा)
-
रोहित शर्माकडे एकूण २७ ब्रँड असून यातून तो चांगले कमावतो. रोहितचे अदिदास, रसना, सीएट, जिओ सिनेमा, मॅक्स लाइफ, डॉक्टर ट्रस्ट आणि हबलॉट यासह अनेक ब्रँड्सशी टाय-अप आहेत.

IND vs NZ LIVE, Champions Trophy 2025 Final: भारतीय संघाला सर्वात मोठा धक्का, रोहित शर्मा आऊट; भारताला विजयासाठी किती धावांची गरज?