-
२००८ साली त्याने श्रीलंकेविरुद्ध डंबुला येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या पहिल्या एकदिवसीय सामन्यात तो गौतम गंभीरसोबत सलामीला उतरला होता. त्याने २२ चेंडूत १२ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
२४ डिसेंबर २००९ साली विराटने श्रीलंकेविरुद्ध कोलकाता येथे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिले शतक झळकावले होते. त्याने ११४ चेंडूत १०७ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
११५ सामने खेळून सर्वाधिक ४००८ धावा करणाऱ्या विराटने १२ जून २०१० रोजी झिम्बाब्वे विरुद्ध हरारे येथे टी२० पदार्पण केले आणि नाबाद २६ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
विराट कोहलीने १९ फेब्रुवारी २०११ रोजी मीरपूर येथे बांगलादेश विरुद्ध भारतासाठी एकदिवसीय विश्वचषकात पदार्पण केले आणि नाबाद शतक (100*) ठोकले. २ एप्रिल २०११ रोजी जेव्हा एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव केला तेव्हा तो विश्वविजेत्या संघाचा एक भाग होता. सौजन्य- (ट्वीटर)
-
विराटने २४ जानेवारी २०१२ रोजी अॅडलेड ओव्हलवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिले कसोटी शतक झळकावले होते. त्याने पहिल्या डावात ११६ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०१३ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला. त्या सामन्यात विराटने मेन इन ब्लूसाठी सर्वाधिक ४३ धावा केल्या होत्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
विराटने २०१४ टी२० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियासाठी सहा सामने खेळले आणि एकूण १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा करून टूर्नामेंटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला. सौजन्य- (ट्वीटर)
-
मेलबर्नमधील २०१४ च्या बॉक्सिंग डे कसोटीच्या शेवटी एमएस धोनीच्या कसोटी क्रिकेटमधून धक्कादायक निवृत्तीनंतर, विराटने ६ जानेवारी २०१५ रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा कसोटी कर्णधार म्हणून पदभार स्वीकारला आणि पहिल्या डावात १४७ धावा केल्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
२७ मार्च २०१६ रोजी मोहाली येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी२० विश्वचषक स्पर्धेतील भारताच्या सुपर १० गट २ सामन्यादरम्यान, विराटने त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळींपैकी एक खेळी खेळली आणि भारताला कांगारूंचा पराभव करून उपांत्य फेरीसाठी पात्र ठरण्यास मदत केली. सौजन्य- (ट्वीटर)
-
विराटने २०१७ मध्ये तीन द्विशतके आणि कसोटीमध्ये दोन शतके आणि सहा एकदिवसीय शतके झळकावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपला उत्कृष्ट फॉर्म कायम ठेवला. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०१४ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींमध्ये तो केवळ १३८ धावा करू शकला होता, या खराब कामगिरीनंतर विराटने २०१८ च्या उन्हाळ्यात इंग्लंडमधील पॉम्स विरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा केल्या. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०१९ मध्ये, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, भारताने पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका जिंकून इतिहास रचला. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०२१ च्या टी२० विश्वचषकातून भारत ग्रुप स्टेजमधून धक्कादायकपणे बाहेर पडल्यानंतर विराट कोहली भारताच्या टी२० कर्णधारपदावरून पायउतार झाला आणि त्यानंतर डिसेंबरमध्ये त्याला एकदिवसीय संघाच्या नेतृत्व पदावरून काढून टाकण्यात आले. सौजन्य- (ट्वीटर)
-
२०२२ च्या टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर चार विकेटने विजय मिळवला होता ज्याचा शिल्पकार विराट होता. तो ५३ चेंडूत ८२ धावांवर नाबाद राहिला आणि त्याने एकहाती विजयावर शिक्कामोर्तब केले होते. सौजन्य- (ट्वीटर)
-
२० जुलै २०२३ रोजी पोर्ट ऑफ स्पेन येथे दोन सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान वेस्ट इंडिजविरुद्ध मैदानात उतरल्यावर विराट कोहली हा ५०० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा चौथा भारतीय आणि एकूण १० वा फलंदाज ठरला. सौजन्य- (ट्वीटर)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर