-
भारत-पाकिस्तान सामन्यात, इशान किशनने शानदार अर्धशतक झळकावून मिडल ऑर्डरमध्ये आपला दावा पक्का केला आहे. त्याने संयमी खेळी खेळून के.एल. राहुलची चिंता वाढवली आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
इशान किशनने ५४ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्यामुळे टीम इंडियाचा डाव सांभाळता आला. इशानने आपल्या वन डे कारकिर्दीतील सातवे अर्धशतक झळकावत संघाला सुरुवातीच्या धक्क्यांमधून बाहेर काढले. सौजन्य- (ट्वीटर)
-
इशान फलंदाजीला आला तेव्हा भारताने अवघ्या ४८ धावांत तीन विकेट्स गमावल्या होत्या. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला यष्टीरक्षक फलंदाज संघासाठी संकटमोचक म्हणून टीम इंडियाच्या मदतीला धावून आला. सौजन्य- (ट्वीटर)
-
टीम इंडियाची ४ विकेट्स ६६ धावांवर पडल्यानंतर इशान किशन आणि हार्दिक पांड्याने पाचव्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानविरुद्ध पाचव्या विकेटसाठी भारताच्या सर्वोच्च भागीदारीचा हा नवा विक्रम आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी, नसीम शाह आणि हारिस रौफ यांच्यासमोर पूर्ण क्षमतेने फलंदाजी करत इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी भारताची ताकद दाखवली. पांड्याने ९० चेंडूत ८७ धावा केल्या, तर इशान किशनने ८१ चेंडूत ८२ धावांची शानदार खेळी केली. सौजन्य- (ट्वीटर)
-
भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना जरी पावसामुळे रद्द झाला असला तरी त्या सामन्यात इशान किशनने एम.एस.धोनीचा विक्रम मोडला आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
स्टार यष्टीरक्षक फलंदाज इशान किशनने ८२ धावा करत शानदार अर्धशतक झळकावले होते. त्याच्या या खेळीने एम.एस. धोनीची बरोबरी केली आहे. वास्तविक, या अर्धशतकासह, किशन एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग चार अर्धशतके करणारा दुसरा भारतीय यष्टीरक्षक फलंदाज ठरला आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता पण, संघाची टॉप ऑर्डर सपशेल अपयशी ठरली होती. त्यानंतर इशान किशनने हार्दिक पांड्यासोबत ५व्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. यादरम्यान, स्टार यष्टीरक्षकाने ८२ धावांची शानदार अर्धशतकी खेळी खेळली. सौजन्य- (ट्वीटर)
-
इशान किशन मोठा फटका मारण्याच्या नादात हारिस रौफच्या गोलंदाजीवर बाद झाला. सामन्यादरम्यान त्याला पायात क्रॅम येत होते. श्रीलंकेत खूप दमट हवामान असल्याने त्याला हा त्रास जाणवत होता. सौजन्य- (ट्वीटर)
त्र्यंबकेश्वर मंदिरातील प्राजक्ता माळीच्या ‘या’ कार्यक्रमाला माजी विश्वस्तांकडून विरोध; म्हणाल्या, “चुकीचा पायंडा…”