-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह वडील झाला आहे. त्यांची पत्नी संजना गणेशन यांनी मुलाला जन्म दिला आहे. बुमराहने सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही माहिती शेअर केली आहे. मुलाच्या जन्मामुळे आशिया चषकातून ब्रेक घेऊन तो भारतात परतला आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
जसप्रीत बुमराहने आज सकाळी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले की, “आम्ही आमच्या लहान मुलाचे, अंगद जसप्रीत बुमराहचे नवीन जगात स्वागत केले. आम्ही खूप आनंदी आहोत आणि आमच्या आयुष्याच्या या नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुराहने यावर्षी १५ मार्च २०२१ रोजी स्पोर्ट्स प्रेझेंटर संजना गणेशनशी लग्न केले. या दोघांनी त्यांच्या लव्हस्टोरीबद्दल कोणाला सुगावा सुध्दा लागू दिला नव्हता. जेव्हा बुमराहच्या लग्नाची बातमी समोर आली तेव्हा बहुतेकांना तो कोणाशी लग्न करणार आहे हे देखील माहित नव्हते. सौजन्य- (ट्वीटर)
-
जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांपैकी एक असलेल्या जसप्रीत बुमराहने २०२१ मध्ये संजना गणेशनसोबत लग्न केले होते. संजना स्पोर्ट्स अँकर आहे. ती भारताचे सामने तसेच आयपीएलचे अँकरिंग करताना दिसते. संजना आयसीसीची डिजिटल इनसाइडर म्हणूनही काम करते. सौजन्य- (ट्वीटर)
-
संजना सुरुवातीच्या काळात प्रसिद्धीपासून दूर होती, पदवीनंतर सॉफ्टवेअर अभियंता म्हणून आयटी कंपनीत काम केले. २०१२ मध्ये तिने फेमिना स्टाइल दिवा स्पर्धेत भाग घेतला जिथे तिने अंतिम फेरी गाठली. एका वर्षानंतर, ती फेमिना मिस इंडिया स्पर्धेतही अंतिम फेरीत पोहचली होती. सौजन्य- (ट्वीटर)
-
बुमराहने मागे एका मुलाखतीत तिच्या विषयी बोलताना खूप गर्विष्ठ आहे सांगितले होते. तो म्हणाला की, “तिला वाटायचे की मी गर्विष्ठ आहे आणि मला वाटायचे की ती गर्विष्ठ आहे. मी तिला अनेकदा पाहिलं होतं, पण आम्हा दोघांची समस्या सारखीच होती. म्हणूनच आम्ही कधीच बोललो नाही. २०१९च्या विश्वचषकादरम्यान मी तिच्याशी पहिल्यांदा बोललो.” सौजन्य- (ट्वीटर)
-
एका मुलाखतीत त्यांच्या प्रेमाविषयी बोलताना बुमराह म्हणाला होता की, “संजनामध्ये अनेक गुण आहेत पण तिची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिला क्रिकेटचे ज्ञान आहे आणि तिला माहीत आहे की जेव्हा एखादा क्रिकेटर त्याच्या वाईट काळात असतो, तर आपण त्याला कसे सामोरे जावे. तिचा प्रेमळ-काळजी घेणारा स्वभाव मला तिच्या जवळ आणतो.” सौजन्य- (ट्वीटर)
-
टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांनी आपल्या मुलाचे नाव ‘अंगद’ ठेवले आहे. बुमराह आपल्या मुलाच्या जन्मासाठी भारतात परतला आहे आणि टीम इंडियाच्या पुढील आशिया कप २०२३च्या सोमवारी नेपाळविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. सौजन्य- (ट्वीटर)
-
बुमराहच्या पुनरागमनानंतरची ही त्याची पहिलीच मोठी स्पर्धा आहे. बुमराहच्या मायदेशी परतल्यामुळे भारतीय संघाला आणखी एका वेगवान गोलंदाजाची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र, मिळालेल्या माहितीनुसार, बुमराह सुपर-४ टप्प्यातील सामन्यांसाठी पुन्हा संघात सामील होणार आहे. आशिया चषकाच्या सुपर-४ टप्प्यातील सामने ६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहेत. सौजन्य- (ट्वीटर)

विराट-अनुष्का देश सोडून लंडनला शिफ्ट झाले कारण…; माधुरी दीक्षितचे पती डॉ. नेनेंनी केला खुलासा; म्हणाले, “त्यांची मुलं…”