-
भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आशिया चषकातील साखळी सामन्यातील भारत विरुद्ध पाकिस्तान लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता सुपर ४ मध्ये दोन्ही संघ रविवारी १० सप्टेंबरला भिडणार आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने आज नेट्समध्ये कसून सराव केला. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने कोलंबो येथील एनसीसीमध्ये इनडोअर सराव सुरू केला आहे. यावेळी स्टार यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलही इनडोअर नेटमध्ये सराव करताना दिसला. बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर टीम इंडियाच्या सरावाची छायाचित्रे शेअर केली आहेत. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडिया ट्वीटर अकाउंटवर टीम इंडियाच्या इनडोअर सरावाची छायाचित्रे शेअर केली आहेत. या छायाचित्रांमध्ये कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, के.एल. राहुल, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर, शुबमन गिल आणि उपकर्णधार हार्दिक पांड्या दिसत आहेत. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज के.एल. राहुलला आशिया चषक गट साखळीतील पहिल्या दोन सामन्यात तो पूर्णपणे तंदुरस्त नव्हता, त्यामुळे त्याला प्लेईंग११मध्ये संधी मिळाली नाही. मात्र, सुपर-४मधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो इनडोअर सराव करत आहे. अशा स्थितीत राहुल पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये पुनरागमन करू शकतो. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोडांच्या मते, “आमचे बॅट्समन धावा काढत असून एकच घटना सारखी-सारखी होत नाही. पाकिस्तानकडे चांगले गोलंदाजी आक्रमण आहे मात्र, प्रत्येकवेळी त्यांचाच वरचष्मा असेल असे नाही. जेव्हा आम्ही चांगली सुरुवात करतो तेव्हा आमचे फलंदाज मोठी धावसंख्या करू शकतात.” सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
पहिल्या दोन सामन्यांसाठी बाहेर असलेला के.एल. राहुलही श्रीलंकेत पोहोचला आहे. आता पाकिस्तानविरुद्धच्या सुपर ४ सामन्यात इशान किशन आणि के.एल. राहुल यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
२ सप्टेंबर रोजी झालेल्या भारत विरुद्ध पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि इशान किशनने शानदार फलंदाजी केली होती. हार्दिक पांड्याने गोलंदाजीत संपूर्ण १० षटके टाकली नाहीत. त्यामुळे भारतीय संघासाठी ही समस्या तयार होऊ शकते. पांड्याकडून गोलंदाजीत चांगल्या कामगिरीची चाहत्यांना अपेक्षा आहे. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
“शार्दुलमुळे संघाला बॅटिंगमध्ये डेप्थ मिळते आणि तो गोलंदाजीही करतो. शमी चांगला गोलंदाज आहे पण त्याची संघात निवड झाल्यास त्याचा आमच्या फलंदाजीवर थोडासा परिणाम होईल. मात्र, असे काही सामने असतील ज्यात आम्हाला गोलंदाज अधिक घ्यावे लागतील,” असे राठोड म्हणाले. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
सूर्यकुमार यादवने प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशीही फलंदाजीबाबत चर्चा केली. द्रविड हे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक असून सूर्यकुमारला आशिया चषकातील सामन्यांमध्ये संधी देणार का? हे आगामी काळातच समजेल. पाकिस्तानविरुद्धच्या गेल्या सामन्यातील कामगिरीमुळे भारतीय खेळाडूंवर दबाव वाढला आहे. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
५ मार्च राशिभविष्य: कृतिका नक्षत्रात १२ राशींच्या काम, खर्च व प्रेमाची स्थिती कशी असणार? पंचांगानुसार तुमच्या राशीचे भाग्य कसे उजळणार?