-
आशिया कप २०२३च्या सुपर-४ फेरीत भारताने पाकिस्तानचा २२८ धावांनी पराभव केला. हा भारताचा एकदिवसीय क्रिकेटमधील पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय आहे. कोलंबोच्या मैदानावरील संपूर्ण सामन्यात भारतीय खेळाडूंनी वर्चस्व गाजवले. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
या सामन्यात विराट कोहलीने केएल राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
पावसाने व्यत्यय आणलेला सामना दोन दिवसांत संपला. रविवारी (१०सप्टेंबर) सामना सुरू झाला, मात्र पावसामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही. खेळ थांबला तोपर्यंत भारताने २४.१ षटकात १४७ धावा केल्या होत्या. सोमवार हा सामन्याचा राखीव दिवस होता. पुढे खेळताना भारतीय संघाने ५० षटकांत ३५६ धावा केल्या. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
विराट कोहली (९४ चेंडूत नाबाद १२२) आणि के.एल. राहुल (१०६ चेंडूत नाबाद १११) यांच्या शानदार शतकांच्या जोरावर ३५६/२ अशी धावसंख्या झाली. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
भारतीय संघाने पाकिस्तानवर २२८ धावांनी मोठा विजय मिळवला आहे. एकदिवसीय इतिहासातील धावांच्या बाबतीत भारताचा पाकिस्तानवरचा हा सर्वात मोठा विजय आहे. यापूर्वी टीम इंडियाने २००८ च्या आशिया कपमध्ये बांगलादेशच्या मीरपूरमध्ये १४० धावांनी त्यांचा पराभव केला होता. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
पाकिस्तान संघाला ३२ षटकात केवळ १२८ धावा करता आल्या. फिरकीपटू कुलदीप यादवने किलर गोलंदाजी केली. त्याने २५ धावांत ५ विकेट्स घेतले. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
पाकिस्तानचे फलंदाज कुलदीप यादवचे चेंडू समजू शकले नाहीत. कुलदीपने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ५ विकेट्स घेत अनेक विक्रम मोडले. एकदिवसीय सामन्यात सर्वाधिक पाच विकेट्स घेणारे भारतीय फिरकीपटू: ३ – हरभजन सिंग, २- कुलदीप यादव, २- युजवेंद्र चहल, २- अनिल कुंबळे, २- अमित मिश्रा, २- सचिन तेंडुलकर, २- के श्रीकांत. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (१२२) याने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील ४७ वे शतक झळकावले. कोहलीने एकदिवसीय कारकिर्दीत १३ हजार धावाही पूर्ण केल्या. सर्वात कमी डावात १३००० वन डे धावा: २६७ – विराट कोहली, ३२१- सचिन तेंडुलकर, ३४१- रिकी पाँटिंग, ३६३ – कुमार संगकारा, ४१६ – सनथ जयसूर्या. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
विराट कोहलीने के.एल. राहुलसोबत तिसऱ्या विकेटसाठी १९४ चेंडूत २३३ धावांची नाबाद भागीदारी केली. आशिया चषकात भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम भागीदारी ठरली. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
एकदिवसीय सामन्यात भारताचा पाकिस्तानविरुद्धचा सर्वात मोठा विजय: कोलंबो- २०२३ मध्ये २२८ धावा, मीरपूर- २००८ मध्ये १४० धावा, बर्मिंगहॅम- २०१७ मध्ये १२४ धावा. एकदिवसीय सामन्यात भारताने २०० धावांच्या फरकाने विजय मिळवला, १९७२ ते २०२१- ४ वेळा, २०२२ ते २०२३- ४ वेळा. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
विराट कोहलीने १२ व्यांदा एका वर्षात १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. विराट कोहली सर्वाधिक वर्षांमध्ये १००० किंवा त्याहून अधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा दुसरा भारतीय फलंदाज ठरला. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
या सामन्यात के.एल. राहुलने १११ धावांची नाबाद खेळी खेळली. त्याचबरोबर भारताने पाकिस्तानविरुद्ध ५० षटकात २ बाद ३५६ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध भारताची वनडेतील सर्वोच्च धावसंख्या: २०२३ मध्ये ३५६/२, २००५ मध्ये ३५६/९, २००४ मध्ये ३४९/७, २०१९ मध्ये ३३६/५. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
नसीम शाह आणि हरिस रौफ दुखापतीमुळे फलंदाजी करू शकले नाहीत. अशा प्रकारे टीम इंडियाने २२८ धावांनी विजय मिळवला. एकदिवसीय आशिया कपमधील सर्वात मोठा विजय: २५६ धावा – भारत विरुद्ध हाँगकाँग, कराची, २००८; २३८ धावा- पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, २०२३; २३३ धावा- पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, ढाका, २०००, २२८ धावा – भारत विरुद्ध पाकिस्तान, कोलंबो, २०२३. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
विराट कोहलीने कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर सलग चौथे एकदिवसीय शतक झळकावले. एकाच मैदानात सलग चार शतके झळकावून कोहलीने दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हाशिम अमलाची बरोबरी केली आहे. आमलाने सेंच्युरियनमध्ये सलग चार एकदिवसीय शतके झळकावली आहेत. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
-
भारतीय गोलंदाजांसमोर पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. संघाचे केवळ चार फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. एकदिवसीय सामन्यात धावांच्या बाबतीत पाकिस्तानचा सर्वात मोठा पराभव: २३४ वि श्रीलंका, लाहोर, २००९; २२८ वि भारत, कोलंबो, २०२३; २२४ वि ऑस्ट्रेलिया, नैरोबी, २००२, १९८ विरुद्ध इंग्लंड, नॉटिंगहॅम, १९९२. सौजन्य- बीसीसीआय (ट्वीटर)
४८ तासांमध्ये ५ राशींचा सुरू होईल सुवर्णकाळ! गजकेसरी राजयोगाचा मिळेल भरपूर लाभ अन् यश, लक्ष्मी ठोठावेल दार