-
चाहत्याच्या मागणीला प्रत्युत्तर देताना म्हणाले, हे काम आधीच झाले आहे. आनंद महिंद्रा यांनी २०२१ साली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेवर कब्जा केल्यानंतर सिराजसह ६ क्रिकेटर्सना थार एसयूव्ही भेट दिली होती. (Source: @anandmahindra/twitter)
-
आशिया कपच्या फायनल सामन्यात ६ विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला आनंद महिंद्रा यांनी २०२१ साली थार कार भेट दिली होती. (Source: @mohammedsirajofficial/instagram)
-
भारतीय संघाचा सलामीवीर शुबमन गिलही थार एसयूव्हीचा मानकरी ठरला होता. (Source: @shubmangill/instagram)
-
२०२१मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या शार्दुल ठाकुरलाही थार मिळाली होती. (Source: @shardul_thakur/instagram)
-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात वेगवान गोलंदाज नवदीप सैनीने शानदार गोलंदाजी केली होती आणि त्यालाही थार मिळाली होती. (Source: @navdeep_saini10_official/instagram)
-
अष्टपैलू वॉशिंगटन सुंदरनेही शार्दुल ठाकुरला साथ देत विजयात महत्वाची भूमिका बजावली होती आणि तो ही थारचा मानकरी ठरला होता. (Source: @washisundar555/instagram)
-
या सामन्यात वेगवान गोलंदाज टी नंटराजनने मोलाचे योगदान दिल्याने त्यालाही थार कार भेट म्हणून मिळाली होती. (Source: Natarajan Thangarasu/Facebook)
-
आनंद महिंद्रा यांनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भालाफेकपटू नीरज चोप्रालाही थार कार भेट दिली होती. (Source: neeraj__chopra/instagram)
-
मॅग्नस कार्लसननंतर जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत दुसऱ्या स्थानी राहिलेल्या बुद्धिबळपटू प्रज्ञानंदलाही थार कार भेट दिली आहे. (Source: @anandmahindra/twitter)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”