-
क्रिकेटचा पहिला विश्वचषक १९७५ मध्ये खेळला गेला. यावेळी भारतीय संघ खूपच कमकुवत होता आणि एकदिवसीय सामने ६० षटकांचे होते. भारताचा पहिला सामना इंग्लंडविरुद्ध होता आणि डेनिस एमिसने जगातील पहिले शतक झळकावले. प्रत्युत्तरात भारताची कामगिरी निराशाजनक होती. टीम इंडियाने हा सामना २०२ धावांनी गमावला. शेवटी वेस्ट इंडिजचा संघ चॅम्पियन ठरला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
१९७९चा विश्वचषकही इंग्लंडमध्ये आयोजित करण्यात आला होता आणि यावेळीही भारतीय संघाला एकही सामना जिंकता आला नाही. तीनही साखळी सामने गमावून भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला. अंतिम सामना यजमान इंग्लंड आणि गतविजेता वेस्ट इंडिज यांच्यात झाला. वेस्ट इंडिजने इंग्लंडचा पराभव करून ही स्पर्धा जिंकली आणि सलग दुसऱ्यांदा विश्वविजेता ठरला. विंडीजने दोन्ही विश्वचषक हे क्लाइव्ह लॉईड यांच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
१९८३ची एकदिवसीय विश्वचषकाची तिसरी आवृत्तीही इंग्लंडमध्ये खेळली गेली. यावेळीही भारतीय संघ खूपच कमकुवत होता. मात्र, या विश्वचषकात कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडीजला साखळी सामन्यात ३४ धावांनी पराभूत केले. त्यानंतर, इंग्लंड, झिम्बाब्वेला दोन वेळा पराभूत केले. भारताने पुढच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ११८ धावांनी पराभव केला आणि उपांत्य फेरीत इंग्लंडचा सहा गडी राखून पराभव केला. फायनलमध्ये भारताचा पुन्हा वेस्ट इंडिजचा सामना झाला आणि टीम इंडियाने हा सामना ४३ धावांनी जिंकून इतिहास रचला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
प्रथमच, विश्वचषक इंग्लंडच्या बाहेर आयोजित करण्यात आला आणि षटकांची संख्या ६० वरून ५० करण्यात आली. भारत आणि पाकिस्तानला सह यजमानपद मिळालं, पण दोन्ही संघ विजेतेपद मिळवू शकले नाहीत. जरी भारतीय संघ उपांत्य फेरी गाठण्यात यशस्वी ठरला असला तरी येथे त्यांना इंग्लंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाने फायनलमध्ये इंग्लंडचा पराभव करून प्रथमच विजेतेपद पटकावले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषकात मोहम्मद अझरुद्दीनच्या नेतृत्वाखाली भारताची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडकडून नऊ धावांनी पराभव झाला होता. श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. पुढच्या सामन्यात टीम इंडियाचा यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध एका धावेने पराभव झाला. यानंतर भारताने पाकिस्तान आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. अंतिम सामन्यात पाकिस्तानने इंग्लंडने पराभव केला आणि पहिल्यांदाच विश्वचषकावर नाव कोरले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
१९९६चा विश्वचषक भारत आणि पाकिस्तानमध्ये दुसऱ्यांदा झाला. यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. साखळी फेरीत चांगली कामगिरी करून भारताने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आणि येथे पाकिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. उपांत्य फेरीच्या सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भारताची सुरुवात चांगली झाली होती, मात्र सचिन बाद होताच संपूर्ण संघ बाद झाला. प्रेक्षकांनी रागाने स्टेडियम पेटवून दिले आणि श्रीलंकेला विजेता घोषित केले. अंतिम फेरीतही श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला हरवले आणि विजेतेपद पटकावले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
१९९९ साली तिसऱ्यांदा इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या या विश्वचषकात राहुल द्रविड आणि सौरव गांगुली यांनी शानदार फलंदाजी केली. या दोघांनी श्रीलंकेविरुद्ध ३१८ धावांची भागीदारी करून इतिहास रचला. टीम इंडियाने साखळी सामन्यात श्रीलंका आणि पाकिस्तानला पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण इथे टीम इंडियाला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आणि भारतीय संघ वर्ल्ड कपमधून बाहेर पडला. ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत करून दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
२००३मध्ये दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच विश्वचषक आयोजित करण्यात आला. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने संपूर्ण स्पर्धेत शानदार खेळ केला. आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या स्पर्धेत टीम इंडियाने शानदार खेळ केला आणि फक्त ऑस्ट्रेलियन संघच भारताला पराभूत करू शकला. साखळी फेरीत सहज विजय मिळवत भारताने सुपर सिक्स फेरीतही श्रीलंकेचा सहज पराभव केला. भारताने फायनलमध्ये धडक मारली, पण इथे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाचा १२५ धावांनी पराभव केला आणि भारताचे चॅम्पियन होण्याचे स्वप्न भंगले. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
दोनवेळचा विजेता संघ वेस्ट इंडीजमध्ये २००७चा विश्वचषक आयोजित करण्यात आला होता. भारतीय संघासाठी हा विश्वचषक वाईट स्वप्नासारखा ठरला. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय संघ ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडला होता. द्रविड, गांगुली आणि सचिनसारख्या दिग्गजांनी भरलेला संघ बांगलादेशकडून हरला आणि विश्वचषकातून बाहेर पडला. या स्पर्धेत टीम इंडियाला बर्म्युडाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला. आयर्लंडकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तान संघही बाहेर पडला. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी राजीनामा दिला. सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन संघ चॅम्पियन झाला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने मायदेशात विश्वचषक खेळला आणि चॅम्पियनही झाला. भारताने पहिल्यांदा २००७ मध्ये बांगलादेशला हरवून पराभवाचा बदला घेतला, त्यानंतर युवराज सिंगच्या शानदार कामगिरीने टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये नेले. भारताने उपांत्यपूर्व फेरीत पाकिस्तानचा तर उपांत्यपूर्व फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून १९८३नंतर दुसऱ्यांदा विश्वचषक जिंकला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
२०१५ सालचा विश्वचषक ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये खेळला गेला. ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वचषकात टीम इंडियाने शमीची शानदार गोलंदाजी आणि फलंदाजांच्या उत्तम कामगिरीच्या जोरावर उपांत्य फेरीत धडक मारली. मात्र, मिचेल जॉन्सनच्या शानदार गोलंदाजीमुळे भारताला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले आणि कांगारू संघ न्यूझीलंडचा पराभव करून चॅम्पियन बनला. त्यांनी पाचव्यांदा विश्वचषक जिंकला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)
-
१९९९ नंतर २०१९साली पुन्हा एकदा इंग्लंडमध्ये विश्वचषक आयोजित करण्यात आला. इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत भारताने शानदार सुरुवात केली. साखळी सामन्यात विजय मिळवत भारताने उपांत्य फेरीत धडक मारली. येथे पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात भारताला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. पुन्हा एकदा टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पराभूत होऊन बाहेर पडली आणि इंग्लंडने फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून पहिल्यांदाच वर्ल्ड कप जिंकला. सौजन्य- आयसीसी (ट्वीटर)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”