-
आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ या स्पर्धेला ५ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.
-
वर्ल्डकपचा पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात रंगणार आहे.
-
यंदाची क्रिकेट विश्वचषक स्पर्धा भारतातही खेळवली जाणार आहे.
-
रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अंतिम सामना होणार आहे.
-
मात्र, यंदाचा क्रिकेट विश्वचषक काही स्टार खेळाडूंचा अखेरचा असू शकतो.
-
त्यात अनेक नावं आहेत, पण आज आपण ६ खास खेळाडूंबद्दल बोलणार आहोत.
-
या सहा खेळाडूंमध्ये तीन भारतीयांचाही समावेश आहे, त्यांची नावे जाणून चाहत्यांना धक्का बसेल. तर एक खेळाडू ऑस्ट्रेलियाचा, एक इंग्लंडचा आणि दुसरा बांगलादेश संघाचा आहे.
-
ऑस्ट्रेलिया संघाचा स्टार सलामीवीर डेव्हिड वॉर्नरही विश्वचषकानंतर निवृत्तीची घोषणा करू शकतो. त्याने यापूर्वीच कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. या विश्वचषकानंतर वॉर्नरनेच निवृत्तीचे संकेत दिले आहेत. वॉर्नर २७ ऑक्टोबरला ३७ वर्षांचा होईल.
-
इंग्लंडचा कसोटी संघाचा ३२ वर्षीय कर्णधार बेन स्टोक्स आयसीसी एकदिवसीय विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर करु शकतो. २०१९ च्या विश्वचषकात इंग्लंडला चॅम्पियन बनवण्यात बेन स्टोक्सचे मोठे योगदान होते.
-
३६ वर्षीय स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसन यावेळी एकदिवसीय विश्वचषकात बांगलादेश क्रिकेट संघाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. मात्र, विश्वचषकानंतर निवृत्ती घेण्याचे संकेत त्याने नुकतेच दिले होते. यावेळी शाकिब आपला पाचवा एकदिवसीय विश्वचषक खेळताना दिसणार आहे.
-
भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन गेल्या महिन्यात १७ सप्टेंबर रोजी ३७ वर्षांचा झाला. विश्वचषकात निवड झाल्यानंतर हा त्याचा शेवटचा विश्वचषक ठरणार असल्याचेही त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या स्पर्धेनंतर तो कसोटीत खेळताना दिसणार आहे.
-
भारताचा कर्णधार रोहित शर्मा ३६ वर्षांचा आहे. पुढील विश्वचषकापर्यंत तो ४० वर्षांचा होईल.अशा स्थितीत तो पुढील विश्वचषक खेळणे अशक्य आहे.
-
तसे, बीसीसीआयने यापूर्वीच हार्दिक पांड्याकडे टी-२० चे कर्णधारपद सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच त्याला सातत्याने अनेक मालिकांमध्ये कर्णधारपद देण्यात आले आहे. विश्वचषकानंतर रोहितला टी-२० आणि वनडेमधून विश्रांती दिली जाऊ शकते किंवा रोहित निवृत्ती घेऊ शकतो.
-
टीम इंडियाचा स्टार विराट कोहलीचाही या यादीत समावेश असू शकतो. हे वाचून चाहत्यांना धक्का बसला असेलच.पण हा विश्वचषक विराटचा शेवटचा असू शकतो.
-
कोहली पुढील महिन्यात ५ नोव्हेंबरला ३५ वर्षांचा होईल. कोहलीचा फिटनेस उत्कृष्ट असला तरी पुढील विश्वचषकासाठी ४ वर्ष वाट पाहावी लागेल. त्यामुळे तो निवृत्ती घेणार अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. (फोटो सौजन्य : indian express)

“असा असतो मराठी मुलींचा दणका”, ‘नटीनं मारली मिठी’ गाण्यावर तरुणींचा जगात भारी डान्स! VIDEO पाहून म्हणाल, वाह्ह…