-
उद्यापासून म्हणजेच ५ ऑक्टोबरपासून विश्वचषकाला सुरुवात होत आहे.
-
उद्घाटनाचा सामना गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.
-
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होणार असून याच मैदानावर १९ नोव्हेंबरला अंतिम सामनाही होणार आहे.
-
या मेगा स्पर्धेत भारतासह एकूण १० संघ सहभागी होत आहेत.
-
४५ दिवस चालणाऱ्या या विश्वचषकात एकूण ४८ सामने खेळवले जाणार आहेत. (फोटो-आयसीसी ट्विटर)
-
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या स्पर्धेतील सामने तुम्हाला फ्री मध्ये पाहता येणार आहे.
-
हे सामने क्रिकेट चाहत्यांना कुठे फ्री मध्ये पाहता येणार, जाणून घेऊया…
-
स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर वर्ल्डकप सामन्यांचे थेट प्रक्षेपण केले जाईल. स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर चाहत्यांना वेगवेगळ्या भाषांमध्ये या सामन्यांचा आनंद घेता येईल.
-
त्याचवेळी, डीडी फ्री डिश वापरणारे दर्शक डीडी स्पोर्ट्सवर भारताचे सामने आणि उपांत्य फेरी आणि अंतिम सामने विनामूल्य पाहू शकतील.
-
तुम्हाला मोबाईलवर सुध्दा सर्व सामने मोफत पाहता येणार आहे. सर्व सामन्यांचे लाइव्ह स्ट्रीमिंग डिज्नी प्लस हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
-
तुम्ही https://www.loksatta.com वरही विश्वचषकाशी संबधित लाईव्ह अपडेट वाचू शकता.
-
(फोटो सौजन्य: financialexpress)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”