-
५ ऑक्टोबरपासून बहुप्रतिक्षित क्रिकेटचा महासंग्राम सुरु झाला आहे. (फोटो-आयसीसी ट्विटर)
-
ही विश्वचषक स्पर्धा १९ नोव्हेंबरपर्यंत रंगणार आहे.
-
वर्ल्ड कपची ट्रॉफी मिळविण्यासाठी यावेळी १० संघ या ट्रॉफीसाठी झुंजणार आहेत.
-
आता कोणता संघ ही ट्राफी आपल्या नावी करतो, हे येणाऱ्या दिवसात आपल्याला कळेलच.
-
पण, तुम्हाला या विश्वचषक ट्राफीची किंमत किती असते, माहिती आहे का..? चला तर मग जाणून घेऊया…
-
क्रिकेट विश्वचषक ट्रॉफी सोने आणि चांदीपासून तयार करण्यात आली आहे. ट्रॉफीमध्ये दिसणारा सोन्याचा रंगाचा चेंडू सोन्याचा असून तीन कॉलम्स चांदीचे आहेत.
-
ट्रॉफीची उंची ६० सेंटीमीटर असून ११ किलो इतकं वजन आहे.
-
सोन्या-चांदीची वर्ल्डकप ट्रॉफी १९९९ पासून अस्तित्वात आहे, अशी माहिती आहे.
-
सध्याची आयसीसी ट्रॉफी ही जगातील टॉप-१० सर्वात महागड्या क्रीडा ट्रॉफींपैकी एक असून त्याची किंमत ३०,००० डॉलर म्हणजेच अंदाजे २४,७६,६५० रुपये आहे. (फोटो सौजन्य : financialexpress)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”