-
टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे एकदिवसीय विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता हार्दिकच्या जागी वेगवान गोलंदाज प्रसिध कृष्णाचा संघात समावेश करण्यात आला आहे. (Photo Source: @skiddyy/instagram)
-
२७ वर्षीय प्रसिद्ध हा एक वेगवान गोलंदाज आहे आणि त्याने २३ मार्च २०२१ रोजी पुण्यात इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. कर्नाटककडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. तो केवळ १७ वनडे खेळला आहे. (Photo Source: @skiddyy/instagram)
-
टी-२० फॉरमॅटमध्ये तो फक्त २ आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे, ज्यामध्ये त्याच्या नावावर एकूण ४ विकेट आहेत. प्रसिधच्या प्रोफेशनल लाईफबद्दल एवढंच पुरेसं आहे, आता त्याची पत्नी रचना कृष्णा बद्दल बोलूया. (Photo Source: @rachana_krishna/instagram)
-
प्रसीदने या वर्षी ८ जून रोजी त्याची दीर्घकाळाची गर्लफ्रेंड रचना कृष्णासोबत लग्न केले. प्रसिधने रचनाशी दक्षिण भारतीय पारंपरिक पद्धतीने लग्न केले. (Photo Source: @rachana_krishna/instagram)
-
प्रसिध आणि रचना यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याच्या लग्नाला भारतीय संघातील अनेक खेळाडूंनी हजेरी लावली होती. (Photo Source: @rachana_krishna/instagram)
-
रचना व्यवसायाने संगणक विज्ञान अभियंता असून अमेरिकेतील टेक्सास येथे काम करते. (Photo Source: @rachana_krishna/instagram)
-
रचना डेल टेक्नॉलॉजीजसाठी उत्पादन व्यवस्थापक म्हणून काम करते आणि ऑस्टिन, टेक्सास येथे राहते. (Photo Source: @rachana_krishna/instagram)
-
रचनाने एडटेक व्यवसाय देखील सुरू केला आहे, ज्या अंतर्गत कॉर्पोरेशन आणि विद्यार्थी यांच्यात पूल बांधणे आणि त्यांच्यातील दरी कमी करणे हे तिचे काम आहे. (Photo Source: @rachana_krishna/instagram)