-
World Cup 2023: भारतीय क्रिकेट संघाने विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बुधवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ७० धावांनी पराभव केला. सामन्यात प्रत्येक खेळाडूने उत्तम कामगिरी केली पण एक व्यक्ती या सामन्याचा हिरो ठरला तो म्हणजे मोहम्मद शमी. (फोटो: पीटीआय)
-
मोहम्मद शमीने ५७ धावा देत न्यूझीलंड संघाच्या ७ विकेट्स घेतल्या. न्यूझीलंडसारखा बलाढय संघ शमीच्या गोलंदाजीसमोर कमी पडला. शमीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. (फोटो: पीटीआय)
-
या विश्वचषकात शमी पूर्ण फॉर्ममध्ये दिसत आहे. या स्पर्धेत त्याने २३ विकेट्स घेतल्या आहेत. तर पहिल्या ४ सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. (फोटो: पीटीआय)
-
पण शमीने क्रिकेट असे पुनरागमन केले सगळे पाहतच राहिले. मात्र, या टप्प्यावर पोहोचण्यापूर्वी शमीला अनेक संकटांचा सामना करावा लागला. (फोटो: पीटीआय)
-
शमीला कधी देशद्रोही म्हटले गेले तर कधी त्याच्यावर विश्वासघाताचे आरोप झाले. शमीवर अनेकवेळा धर्माच्या आधारे आरोप करण्यात आले.. शमी इतका नाराज झाला होता की तो आत्महत्या करण्याचा विचार करत होता. (फोटो: पीटीआय)
-
२०२१ मध्ये झालेल्या टी-२० विश्वचषकाची ही गोष्ट आहे जेव्हा भारताचा पाकिस्तानकडून वाईट पराभव झाला होता. या सामन्यानंतर अनेक सोशल मीडिया यूजर्सनी शमीला ट्रोल केले आणि त्याला देशद्रोही म्हटले. (फोटो: पीटीआय)
-
मोहम्मद शमीवरही विश्वासघात केल्याचे आरोप झाले होते. हे आरोप त्यांची पत्नी हसीन जहाँने केले आहेत. याशिवाय हसीन जहाँने शमीवर अनेक गुन्हे दाखल केले होते. शमी मूकपणे सर्व काही सहन करत राहिला. (फोटो: पीटीआय)
-
कोरोनाच्या काळात शमीने रोहित शर्मासोबत ऑनलाइन लाईव्ह चॅट दरम्यान सांगितले होते की, या सर्व गोष्टींमुळे तो इतका अस्वस्थ झाला होता की त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. (फोटो: पीटीआय)
-
मोहम्मद शमी एकदा म्हणाला होता, ‘जर मला माझ्या कुटुंबाचा पाठिंबा मिळाला नसता तर मी क्रिकेट सोडले असते. मी तीन वेळा आत्महत्या करण्याचा विचार केला. (फोटो: पीटीआय)
-
शमी विश्वचषकातून भारतीय संघात परत आला आणि असे पुनरागमन केले की सर्वजण थक्क झाले. शमी हा एकमेव भारतीय गोलंदाज आहे ज्याने वनडेत ७ विकेट्स घेतल्या आहेत. शमीने वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक २३ विकेट घेण्याचा विक्रमही केला आहे. (फोटो: पीटीआय)
-
शमीच्या पुनरागमनानंतर त्याने विश्वचषक सामन्याच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारतासाठी या विकेट घेतल्या. सर्वांनी त्याच्या कामगिरीचे कौतूक केले. ज्या लोकांनी शमीला एकेकाळी देशद्रोही आणि अनफिट म्हटले होते त्याच लोकांना त्याने टाळ्या वाजवायला भाग पाडले. त्यामुळेच आज लोक असेही म्हणत आहेत की मोहम्मद शमी होणे सोपे नाही. (फोटो: पीटीआय)

भाऊ कदम स्वत:च्या मुलींच्या लग्नात जाणार नाही? भावुक होत म्हणाले, “त्यांच्या लग्नाच्या विचाराने…”