-
India Vs Australia World Cup 2023 Final: भारतीय संघाने विश्वचषक २०२३ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताचा सामना ५ वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या संघाशी आज १९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. दोन्ही संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. एकीकडे भारताने सलग १० सामने जिंकले आहेत. त्याच वेळी, ऑस्ट्रेलियाने सुरुवातीला २ सामने गमावले, परंतु यानंतर संघाने सलग ८ सामने जिंकून अंतिम फेरी गाठली
-
अशा स्थितीत भारताला ऑस्ट्रेलियापासून सावध राहावे लागणार आहे. ऑस्ट्रेलिया संघातील ५ मजबूत खेळाडू भारतासाठी अडचणीचे ठरू शकतात, असे मानले जात आहे. आम्ही तुम्हाला त्या खेळाडूंबद्दल सांगतो ज्यांच्यासोबत फायनलमध्ये भारताला सावधगिरीने खेळावे लागेल.
-
डेव्हिड वॉर्नर
ऑस्ट्रेलियन सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने विश्वचषक २०२३ मध्ये आतापर्यंत १० सामन्यांमध्ये ५२८ धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्याने ४९ चौकार आणि २४ षटकार मारले आहेत. उपांत्य फेरीत १८ चेंडूत २९ धावा करून दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन आपल्या संघाला अंतिम फेरीत नेण्यात तो यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाला २०१५ विश्वचषक चॅम्पियन बनवण्यातही वॉर्नरने महत्त्वाची भूमिका बजावली होती. -
मिचेल स्टार्क
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क संपूर्ण स्पर्धेत फॉर्ममध्ये नव्हता. परंतु सेमीफायनल येईपर्यंत तो फॉर्मामध्ये आला. उपांत्य फेरीत त्याने आफ्रिकेविरुद्ध ३ बळी घेतले होते. अशा स्थितीत भारतालाही अंतिम फेरीत स्टार्कपासून सावध राहण्याची गरज आहे. -
ग्लेन मॅक्सवेल
क्षणार्धात सामना बदलण्याची क्षमता मॅक्सवेलकडे आहे. मॅक्सवेलने या स्पर्धेतील 8 सामन्यात 398 धावा केल्या आहेत. त्याने या विश्वचषकात अफगाणिस्तानविरुद्ध द्विशतक झळकावले आणि आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात यश मिळवले. अशा स्थितीत भारतालाही मॅक्सवेलला टाळूनच खेळावे लागणार आहे. -
मिचेल मार्श
मिचेल मार्शने या संपूर्ण स्पर्धेत आतापर्यंत ४२६ धावा केल्या आहेत. या काळात त्याने पाकिस्तान आणि बांगलादेशविरुद्धही शतके झळकावली. उपांत्य फेरीत विजय मिळवल्यानंतर भारताला पराभूत करून विश्वचषक जिंकणार अशी भविष्यवाणी त्याने केली होती. त्याने आपल्या वक्तव्यात काहीही म्हटले तरी भारतीय संघाला त्याच्यापासून सुरक्षित खेळावे लागणार आहे आणि त्यामुळे त्याला चुकीचे सिद्ध करण्यासाठी भारताला सर्व ताकद वापरावी लागणार आहे. -
ॲडम झाम्पा
ॲडम झाम्पाने या विश्वचषकातील १० सामन्यांमध्ये एकूण २२ विकेट घेतल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक विकेट घेणारा तो दुसऱ्या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत ॲडम टीम इंडियासाठी घातक ठरू शकतो. त्यामुळे भारतीय संघाला ॲडमपासून सावध राहण्याची गरज आहे.
(फोटो सौजन्य: ESPNcricinfo)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”