-
ICC पुरुष विश्वचषक २०२३ च्या विजेत्याला प्रतिष्ठित विश्वचषक ट्रॉफीसह तब्बल ४० लाख डॉलर्स (अंदाजे 33 कोटी रुपये) मिळणार आहेत. यानुसार ऑस्ट्रेलियाला लीग टप्यातील ७ विजयांचे, उपांत्य फेरीचे व विजेतेपदाचे असे मिळून एकूण ५०. ८ लाख डॉलर्स म्हणजे ४१ कोटी २४ लाख रुपये मिळणार आहेत.
-
अंतिम फेरीतील उपविजेत्या संघास २० लाख डॉलर्स (अंदाजे रु. १६ कोटी) मिळतील अशी घोषणा आयसीसीने केलेली होती. यानुसार भारताला लीग टप्यातील १० विजयांचे ४ लाख डॉलर्स, उपांत्य फेरीत प्रवेशाचे ८ लाख डॉलर्स व उपविजेते पदाचे २० लाख डॉलर्स असे एकूण २५ कोटी ६० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळणार आहे
-
उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांना प्रत्येकी ८ लाख डॉलर्स (अंदाजे ६ कोटी रुपये) देण्यात येणार होते.
-
दक्षिण आफ्रिकेला ७ सामन्यांचे २.८० लाख डॉलर्स अर्थात २ कोटी २४ लाख रुपये व उपांत्य फेरीत पोहोचल्याचे अतिरिक्त ८ लाख डॉलर्स म्हणजे साधारण ६ कोटी अशी एकूण ८ कोटींहून अधिक बक्षिसाची रक्कम मिळणार आहे
-
तर न्यूझीलंडने भारतात लीग सामने व उपांत्य फेरीत पराभूत होऊन विश्वचषकाच्या दरम्यान ८ कोटींच्या आसपास (७ कोटी ६० लाख) रुपयांची कमाई केली आहे.
-
पाकिस्तानने चार सामने जिंकून २. ६० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास २ कोटी ८ लाख रुपयांची कमाई विश्वचषकात केली आहे
-
अफगाणिस्तानने सुद्धा लीग टप्प्यात चार सामने जिंकून २. ६० लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास २ कोटी ८ लाख रुपयांची कमाई विश्वचषकात केली आहे
-
इंग्लंडने तीन सामन्यात विजय मिळवून २. २० लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ७६ लाख मिळवले आहेत
-
तर बांगलादेश, श्रीलंका, नेदरलँड यांनी प्रत्येकी दोन सामन्यांच्या विजयामुळे १. ८० लाख डॉलर्स म्हणजेच १ कोटी ४४ लाख रुपयांचे बक्षीस मिळवले आहे. (सर्व फोटो: X/@ICC)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”