-
१९ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत सहाव्यांदा विश्वविजेता ठरला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू खूपच निराश दिसले.
-
टीम इंडियाचे १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्नही भंगले. पराभवानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती.
-
या स्पर्धेत सलग १० विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीत पराभवाचा सामना करणे भारतीय खेळाडूंसाठी सोपे नाही. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.
-
या पराभवानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही भावूक दिसला. जसप्रीत बुमराहने त्याला मिठी मारून सांत्वन केले.
-
पराभवानंतर विराट कोहलीलाही अश्रू आवरता आले नाही. त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याला मिठी मारून सांत्वन केले.
-
ऑस्ट्रेलिया संघाच्या फलंदाजांनी विजयी धाव घेतल्यानंतर केएल राहुलही निराश दिसला. पराभवानंतर तो उदास होऊन जमिनीवर बसला.
-
सात सामन्यात २४ विकेट घेणारा मोहम्मद शमीही पराभवानंतर निराश दिसला. त्याने अंतिम सामन्यात फक्त १ विकेट घेतली.
-
पराभवानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले. त्यांनी मोहम्मद शमीला मिठी मारून त्याचे सांत्वन केले.
-
शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल या पराभवानंतर निराश चेहऱ्याने मैदानाबाहेर जाताना दिसले. (Photos Source: PTI)

Ram Navami 2025 Wishes : रामनवमीच्या मराठी शुभेच्छा पाठवा प्रियजनांना, वाचा एकापेक्षा एक हटके संदेश