-
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने एकदिवसीय विश्वचषकात शानदार गोलंदाजी केली. मोहम्मद शमीने सात सामन्यात २४ विकेट्स घेत स्पर्धेमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.
-
मोहम्मद शमी क्रिकेटच्या मैदानावर जितका हिट आहे, तितकाच तो क्रिकेटच्या मैदानाबाहेरही आलिशान जीवन जगतो. उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यातील अलीनगर भागात त्यांचे एक आलिशान फार्म हाऊस आहे.
-
हे फार्म हाऊस सुमारे १५० बिघा परिसरात पसरले आहे. त्याने आपल्या फार्म हाऊसचे नाव ‘हसीन’ ठेवले असून त्याची किंमत १५ कोटी रुपये आहे.
-
या ठिकाणी मोहम्मद शमी ब्रेकच्या वेळी सामन्यांचा सराव करतो. त्याला फार्म हाऊसमध्ये वैयक्तिक क्रिकेट खेळपट्टी देखील तयार केला आहे.
-
याशिवाय शांततेत वेळ घालवण्यासाठी तो या फार्म हाऊसवर येतो. येथे एक स्विमिंग पूल देखील आहे, जेथे विश्रांतीसोबतच पोहण्याचा आनंदही घेतो.
-
मोहम्मद शमीने फार्म हाऊसमध्ये काही झाडे लावली आहेत, जी ऑक्सिजन आणि आणि फळेही देतात.
-
त्याने फार्म हाऊसमध्ये आलिशान गाड्यांचे कलेक्शन आहे. त्याच्याकडे टोयोटा फॉर्च्युनर, बीएमडब्ल्यू ५ सीरीज आणि ऑडी सारख्या कार आहेत.
-
याशिवाय त्याच्याकडे बाईक्सचेही अप्रतिम कलेक्शन आहे. त्याच्याकडे रॉयल एनफील्ड कॉन्टिनेंटल जीटी ६५० आहे. (Photos Source: @mdshami.11/instagram)
Champions Trophy Final: भारताच्या विजयाचा पाकिस्तानला सर्वात मोठा धक्का, यजमान देशात होणार नाही चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना