-
भारतातील लोकप्रिय क्रिकेट लीग म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या आयपीएलचा लिलाव आता काहीच दिवसांवर येऊन ठेपला आहे. 19 डिसेंबर रोजी दुबई येथे हा लिलाव होणार आहे. (IPL)
-
आरसीबीकडे २३.२५ कोटी रुपये इतकी मोठी रक्कम असून यंदाच्या हंगामासाठी ते काही कुशल गोलंदाजांना खरेदी करण्याच्या विचारात आहेत. यामागचे कारण म्हणजे त्यांनी लिलावापूर्वीच त्यांच्या संघातील गोलंदाज सोडले आहेत.
-
आरसीबीने कायम ठेवलेले खेळाडू: फाफ डु प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, कॅमेरॉन ग्रीन (एमआयकडून ट्रेड केलेले), रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयांक दागर (SRH कडून ट्रेड केलेले), विशक विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार. (ANI)
-
यंदाच्या लिलावात आरसीबी पाच खेळाडूंना लक्ष्य करू शकते. हे खेळाडू कोणते आहेत त्यावर नजर टाकुया.
-
मिचेल स्टार्क : ऑस्टेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क त्याचे जवळपास सर्वच आयपीएल क्रिकेट सामने आरसीबीमधून खेळला आहे. मिचेल स्टार्क ८ वर्षानंतर त्याच फ्रेंचायझीमध्ये परतण्याची शक्यता नाकारता येत नाही. (ANI)
-
आरसीबीकडे रीस टोपले हा त्यांचा मुख्य डावखुरा वेगवान गोलंदाज आहे. मात्र, स्टार्कची उत्तम खेळी पाहता आणि विशेषत: इंग्लंडच्या गोलंदाजाच्या दुखापतीनंतर आरसीबी स्टार्कला आपल्या संघात घेण्यासाठी उत्सुक असू शकते. (Source: BCCI/IPL)
-
भारताचा वेगवान गोलंदाज कार्तिक त्यागी हा भारतीय 19 वर्षाखालील संघाचा स्टार खेळाडू होता. तो आतापर्यंत राजस्थान रॉयल्स (RR) आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH) कडून खेळला आहे.(Photo: Official instagram account)
-
कार्तिकने आपल्या आयपीएल कारकिर्दीत १९ सामन्यांमध्ये १५ विकेट्स घेतल्या आहेत. यंदा कार्तिक आयपीएलच्या लिलावात आहे तसेच आरसीबीही देशांतर्गत वेगवान तरुण गोलंदाजाच्या शोधात असल्याने कार्तिक आरसीबीतील एक गोलंदाज असू शकतो. (ANI)
-
डॅनियल सॅम्स हा उत्तम T20 खेळाडू असून त्याने जवळपास जगातील सर्व लीगमध्ये खरोखरच चांगली कामगिरी केली आहे. मात्र, त्याच्या आयपीएल कारकिर्दीला अजून वेग आलेला नाही. (Photo: Official instagram account)
-
लखनौ सुपर जायंट्सने सोडलेला, सॅम्स लिलावात उपलब्ध आहे. तसेच आरसीबीला त्यांच्या संघात सॅम्ससारखाच एक गोलंदाज हवा आहे जो चांगली फलंदाजीही करू शकेल. (Photo: Official instagram account)
-
लेग-स्पिनर युझवेंद्र चहलला सोडणे हा आरसीबीने घेतलेल्या सर्वात वाईट निर्णयांपैकी एक आहे. आता संघाला युझवेंद्र चहलची जागा भरून काढणे अतिशय गरजेचे आहे. (Photo: Official instagram account)
-
अशातच आदिल रशीदसारखा एक दर्जेदार टी-20 गोलंदाज मिळाल्यास आरसीबी त्यांची गोलंदाजी मजबूत करू शकतात. (Photo: Official instagram account)
-
सरफराज खानच्या आयपीएल करिअरची सुरुवात आरसीबीमधून झाली. सुरुवातीच्या काळात तो आरसीबीसाठी फ्लॉप ठरला होता. त्यानंतर आरसीबीने सरफराजला सोडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने (DC) त्याला विकत घेतले. (Photo: Official instagram account)
-
यंदाच्या आयपीएल लिलावासाठी सरफराज उपलब्ध असून त्याची खरी क्षमता ओळखून आरसीबी त्याला पुन्हा संघात घेऊ शकते. (Photo: Official instagram account)
-
यंदाच्या IPL ट्रॉफीवर आरसीबी कोरणार नाव? ‘या’ पाच खेळाडूंना मिळू शकते संघात स्थान
Devendra Fadnavis : लाडक्या बहिणींना २१०० रुपये कुठल्या महिन्यापासून मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही…”