-
अनेक पाकिस्तानी खेळाडूंनी इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण तुम्हाला माहितेय का की यापूर्वी एक दोन नव्हे तर तब्बल ९ पाकिस्तानी क्रिकेटर्स आयपीएलमध्ये वेगवेगळ्या संघांमधून खेळले आहेत. या खेळाडूंनी आयपीएल दरम्यान कोणत्या संघात योगदान दिले व त्यासाठी किती मानधन घेतले हे पाहूया..
-
यष्टिरक्षक कामरान अकमलच्या सेवा राजस्थान रॉयल्सने ६० लाख रुपयांना विकत घेतले होते.
-
सोहेल तन्वीर या पाकिस्तानच्या माजी डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाला राजस्थान रॉयल्सने ४०.१६ लाख रुपयांना खरेदी केले
-
युनूस खान राजस्थान रॉयल्स संघात होता आणि त्याच्या सेवा ९०.३६ लाख रुपयांना विकत घेण्यात आल्या होत्या.
-
मोहम्मद हाफिज कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळला असून त्याच्या सेवा फ्रँचायझीने त्याला ४०. १६ लाख रुपयांना विकत घेतले होते.
-
पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी डेक्कन चार्जर्सचा भाग होता आणि तो २.७१ कोटी रुपयांच्या किंमतीसह पाकिस्तानचा सर्वात महागडा क्रिकेटर होता
-
शोएब मलिक आणि मोहम्मद आसिफ यांच्या सेवा दिल्ली डेअरडेव्हिल्सने अनुक्रमे २ कोटी आणि २. ६१ कोटी रुपयांना विकत घेतले.
-
आफ्रिदीआधी शोएब अख्तर हा सर्वात महागडा खेळाडू होता. त्याला कोलकाता नाईट रायडर्सने १.७ कोटी रुपयांना संघात समाविष्ट करून घेतले होते.
-
सलमान बटने कोलकाता नाईट रायडर्स (KKR) साठी एकूण ७ सामने खेळले ज्यात त्याने १९३ धावा केल्या होत्या. त्याला ४०. १६ लाख रुपयात संघात समाविष्ट करून घेण्यात आले होते.
-
मिसबाह-उल-हक रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता ज्यासाठी आरसीबीने ५०.२ लाख रुपये खर्च केला होता. (सर्व फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम/ X)

IND vs PAK: “माझी विकेटनंतर सेलिब्रेट करण्याची…”, गिलला बोल्ड केल्यानंतर भुवई उंचावणाऱ्या पाकिस्तानच्या अबरारचं मोठं वक्तव्य; सामन्यानंतर काय म्हणाला?