-
भारतीय कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर करत पत्नी रितिका सजदेहला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. रितिका गुरुवार, २१ डिसेंबर रोजी तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे.
-
रोहित सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून २६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या तयारीत व्यस्त आहे. त्याच्यासोबत रितिका आणि मुलगी समायराही हजर आहेत.
-
विश्वचषक २०२३ च्या अंतिम फेरीत हरल्यानंतर रोहित शर्मा ब्रेकवर आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली आणि प्रोटीज संघाविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतही हिटमॅनची निवड झाली नाही.
-
रोहित आता पूर्णपणे ताजेतवाने होऊन कसोटी मालिकेत पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये दिसणार आहे. गुरुवारी, रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली.
-
यामध्ये त्याने रितिकासोबतचे स्वतःचे काही न पाहिलेले फोटो शेअर केले आहेत. पोस्टच्या कॅप्शनमध्ये रोहितने लिहिले की, ‘पार्टी करण्यासाठी फक्त दुसरे निमित्त. वाढदिवसाच्या शुभेच्छा रित्स.’
-
आयपीएलच्या हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्सचा कर्णधार नाही. त्याच्या जागी एमआयने हार्दिकला नवा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.
-
मुंबई इंडियन्सच्या या निर्णयावर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला होता. काही ठिकाणी चाहत्यांनी एमआय संघाची जर्सी जाळली. (Photo Source – Rohit Sharma Insta)

Waqf Bill Controversy: “अलविदा नितीश कुमार..”, वक्फ विधेयक मंजूर होताच नितीश कुमारांच्या पक्षात बंडखोरी; नाराज नेत्यांचे राजीनामे