-
आयपीएलच्या शेवटच्या मोसमात चेन्नई सुपर किंग्जकडून दमदार गोलंदाजी करणाऱ्या तुषार देशपांडेचे लग्न केले आहे. त्याने नभा गड्डमवारसह सात फेरे घेतले.
-
नभा गड्डमवार ही तुषार देशपांडेची शालेय क्रश होती. दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते.
-
दोघांनी याच वर्षी जूनमध्ये एंगेजमेंट केली होती. एंगेजमेंटनंतर तब्बल सहा महिन्यांनी २१ डिसेंबरला त्यांचा विवाह झाला.
-
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की नभा ही तुषारची शाळेपासूनच क्रश आहे. याबाबत त्यांनी स्वतः अनेकदा सांगितले आहे.
-
नभा एक आर्टिस्ट असून तिचे पेंटेड पॅलेट नावाचे इंस्टाग्राम अकाउंट आहे, ज्यावर ती तिने बनवलेल्या पेंटिंग्ज शेअर करत असते. ती फॅशन डिझायनरही आहे.
-
नभा आणि तुषार खूप दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. आयपीएल २०२३ दरम्यान अनेक प्रसंगी, नभा तुषारला स्टँडवरून सपोर्ट करताना दिसली.
-
ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये हा विवाह पार पडला. यावेळी कुटुंबीय, मित्र, नातेवाईकांसह तुषारचे चेन्नई सुपर किंग्जचे काही सहकारीही दिसले.
-
तुषार देशपांडे यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या लग्नाची माहिती शेअर केली आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हृदयांची भेट, एक नवीन सुरुवात, जय बजरंग बली.’
-
फोटोग्राफरला टॅग करत त्याने लिहिले, ‘आमच्या आयुष्यातील हे खास क्षण इतक्या सुंदरपणे टिपल्याबद्दल धन्यवाद.’ (Photo Source -Tushar Deshpande Insta)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”