-
रिंकू सिंग चर्चेत येण्याची सुरुवात आयपीएल २०२३ पासून झाली. रिंकूने गुजरात टायटन्सविरुद्ध पाच चेंडूत पाच षटकार मारून प्रसिद्धी मिळवली.
-
या सामन्यात केकेआरला पाच चेंडूत २८ धावांची गरज होती. त्यानंतर रिंकूने यश दयालला सलग पाच षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला.
-
यानंतर त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेतील अनेक सामन्यांमध्ये भाग घेतला. त्याने वेळोवेळी उत्तर प्रदेशसाठी उत्कृष्ट खेळी खेळल्या.
-
रिंकूलाही यावर्षी भारताकडून पदार्पणाची संधी मिळाली. त्याने आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेतून पदार्पण केले.
-
यानंतर त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत संधी मिळाली. २३ नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० मध्ये रिंकू सिंगने १४ चेंडूत २२ धावांची शानदार खेळी केली.
-
त्याने सामन्यात षटकार मारून सामना जिंकवला. मात्र, तो नो बॉल असल्याने या सहा धावा त्याच्या खात्यात जमा झाल्या नाहीत.
-
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत पहिले अर्धशतक झळकावण्यात आणि आपली छाप सोडण्यात रिंकू पूर्णपणे यशस्वी ठरला. यानंतर त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 खेळण्याची संधीही मिळाली.
-
या मालिकेत रिंकूला बॅटने चमक दाखवण्यात यश आले नाही. त्याला दुसऱ्या वनडेत संधी मिळाली.
-
त्याला बॅटने फटकेबाजी करता आली नाही. पण रिंकूने दक्षिण आफ्रिकेच्या रॅसी व्हॅन डर डुसेनला त्याच्या कारकिर्दीतील पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर संजू सॅमसनच्या हाती झेलबाद केले. (Photo Source – Rinku Singh Instagram)

Kitchen jugaad: महिलांनो सिलिंडरखाली टिकलीचं पॅकेट नक्की ठेवा; मोठ्या समस्येवर उपाय, परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही