-
आयसीसी टी-२० विश्वचषक २००७ चे विजेतेपद भारताला जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा वेगवान गोलंदाज जोगिंदर शर्माने ३ फेब्रुवारी रोजी क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. (Photo Source -X)
-
सलामीवीर मुरली विजयने ३० जानेवारी २०२३ रोजी क्रिकेटला अलविदा केला. मुरली विजयने भारतासाठी ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (Photo Source -X)
-
अष्टपैलू गुरकीरत सिंग मानने नोव्हेंबर २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. ३३ वर्षीय गुरकीरत सिंग मानने भारतासाठी ३ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले. (Photo Source -X)
-
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने २०२३ च्या ऍशेस मालिकेदरम्यान आपल्या कारकिर्दीतील शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. ब्रॉडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ८४७ विकेट घेत आपल्या कारकिर्दीचा शेवट केला. (Photo Source -X)
-
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकने २०२३ च्या आयसीसी क्रिकेट विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटला अलविदा केला. आता तो फक्त टी-२० खेळताना दिसणार आहे. (Photo Source -X)
-
वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेनने या वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. सुनील नरेनने ६ कसोटी, ६५ एकदिवसीय आणि ४९ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. (Photo Source -X)
-
डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तिसरा सामना शेवटचा कसोटी सामना असणार आहे. (Photo Source -X)
-
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघाची कर्णधार मेग लॅनिंगनेही यावर्षी क्रिकेटला अलविदा केला. लॅनिंगने नोव्हेंबर 2023 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. (Photo Source -X)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”