-
भारताचे महान फलंदाज आणि सध्याच्या क्रिकेट पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा आज ५१वा वाढदिवस आहे. (Photos: rahuldravidofficial/Instagram)
-
‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणाऱ्या राहुल यांचा जन्म ११ जानेवारी १९७३ रोजी झाला. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण त्यांची पत्नी विजेताबरोबरची सुंदर लव्हस्टोरी जाणून घेऊया. (Photos: rahuldravidofficial/Instagram)
-
१९७६ साली जन्मलेल्या विजेता पेंढारकर राहुल यांच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान आहेत. त्यांचे वडील निवृत्त विंग कमांडर आणि आई आहारतज्ञ होत्या. (Photos: Social Media)
-
विजेता यांचे वडील लष्करी सेवेत असल्याने त्यांची सतत बदली व्हायची. राहुल आणि विजेता यांच्यातील मैत्री वाढण्यासाठी हीच गोष्ट कारणीभूत ठरली. (Photos: Social Media)
-
त्यांचे वडील सेवानिवृत्त होऊन ते कायमस्वरूपी नागपूरमध्ये स्थायिक होईपर्यंत त्यांनी अनेक ठिकाणी वास्तव्य केले. (Photos: Social Media)
-
नोव्हेंबर २००२ मध्ये, विजेता यांनी नागपूरमधून वैद्यकीय सर्जन (सामान्य) पदवी प्राप्त केली. हा त्यांच्या शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा होता. (Photos: Social Media)
-
विजेता आणि राहुल यांची मैत्री जवळपास ३५ वर्षाहून जास्त आहे. विजेता यांचे वडील विंग कमांडर असताना १९६८ ते १९७१ पर्यंत ते बंगळुरूमध्ये वास्तव्यास होते. (Photos: Social Media)
-
त्यानंतर राहुल द्रविड यांचे वडील शरद यांनी नागपुरात काम केले. यावेळी तरुण राहुल द्रविड आणि विजेता पेंढारकर यांना आपली मैत्री जोपासण्याची आणि ती अधिक दृढ करण्याची संधी मिळाली. (Photos: rahuldravidofficial/Instagram)
-
विजेताच्या मैत्रिणींनी अनेकदा राहुल यांची विजेताबद्दलची आवड पाहिली. संधी मिळाल्यावर राहुल वारंवार नागपूरला येत असत. (Photos: rahuldravidofficial/Instagram)
-
जसजशी त्यांची मैत्री घट्ट होत गेली, तसतसे पालकांनी त्यांच्या मुलांच्या इच्छा जाणून घेतल्या आणि त्यांचे नाते कौटुंबिक संबंधात बदलण्याचा निर्णय घेतला. त्वरीत, दोघांच्या लग्नाची तारीख निश्चित करण्यात आली. (Photos: Social Media)
-
तारीख स्पष्ट नसली तरी, २००३ च्या विश्वचषकापूर्वी राहुल आणि विजेता यांनी लग्न केले होते. दक्षिण आफ्रिकेतील सामन्यांमुळे लग्न पुढे ढकलावे लागले होते. (Photos: Social Media)
-
राहुल आणि विजेता यांचा विवाह ४ मे २००३ रोजी होणार होता. या जोडप्याने बंगळुरूच्या बाहेरील सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) प्रशिक्षण केंद्रात पारंपारिक महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करण्याचे ठरवले. (Photos: rahuldravidofficial/Instagram)
-
लग्नसोहळ्यात वधू आणि वर दोघांनीही पारंपरिक मराठी पेहराव केला होता. सकाळी साडेनऊ वाजता सुरू झालेला विवाह सोहळा दुपारी ३ वाजता संपला. या जोडप्याला आज समित आणि अन्वय नावाची दोन मुले आहेत. (Photos: Social Media)
VIDEO: “जेव्हा नवरीला मनासारखा नवरा भेटतो” लग्नात नवरीचा भन्नाट डान्स; नवरदेव लाजून लाल तर सासूबाईंची रिअॅक्शनही बघाच