-
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना रविवारी खेळवला जाणार आहे. (Photo Source – BCCI X)
-
हा सामना इंदूर येथे संध्याकाळी ७ वाजल्यापासून खेळवला जाईल. दरम्यान, जाणून घ्या भारत आणि अफगाणिस्तानच्या खेळाडूंच्या पगारात काय फरक आहे. (Photo Source – ACBofficials X)
-
भारत आणि अफगाणिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या मानधनात मोठी तफावत आहे. अफगाणिस्तानच्या खेळाडूंना दर महिन्याला पगार मिळतो. (Photo Source – ACBofficials X)
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अफगाणिस्तानच्या टॉप खेळाडूंना दरमहा सुमारे ५८ हजार रुपये मिळतात. या स्टार खेळाडूंचे वार्षिक वेतन सुमारे ६ लाख रुपये आहे. (Photo Source – ACBofficials X)
-
भारतीय क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंना चार श्रेणींमध्ये वेतन देते. A+, A, B आणि C. बोर्ड खेळाडूंना चार श्रेणींमध्ये विभागते आणि नंतर त्यांना श्रेणीनुसार वेतन मिळते. (Photo Source – BCCI X)
-
A+ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये, A श्रेणीच्या खेळाडूला ५ कोटी रुपये, B श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी ३ कोटी रुपये आणि C श्रेणीतील खेळाडूला दरवर्षी १ कोटी रुपये मिळतात. (Photo Source – BCCI X)
-
या अहवालांच्या माहितीनुसार अफगाणिस्तानच्या युवा खेळाडूंना कमी पगार मिळतो. युवा खेळाडूंचा पगार ३२ ते ४८ हजारांपर्यंत असतो. युवा खेळाडूंच्या वार्षिक पगाराबद्दल बोलायचे झाले तर त्यांना दरवर्षी ४ ते ५ लाख रुपये मिळतात. (Photo Source – ACBofficials X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”