-
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेतील तिसरा सामना पहिल्यांदा बरोबरीत सुटला. यानंतर या सामन्याचा निकाल दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये लागला.
-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका सामन्यात प्रत्येकी दोन सुपर ओव्हर टाकण्याची ही पहिलीच वेळ होती. आयपीएलमध्ये याआधीही असे घडले आहे. आयपीएल २०२० मध्ये पंजाब विरुद्ध मुंबई सामन्यात दोन सुपर ओव्हर खेळवाव्या लागल्या होत्या.
-
या सामन्यात दोन्ही संघांनी २१२-२१२ धावा केल्या. म्हणजे 40 षटकांत एकूण ४२४ धावा झाल्या. इतक्या धावा करूनही सामना बरोबरीतच राहिला. टाय झालेल्या सामन्यांमध्ये सर्वाधिक धावांच्या बाबतीत हा सामना दुसऱ्या स्थानावर आहे.
-
पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा क्राइस्टचर्च टी-२० सामना आहे. २०१० मध्ये झालेल्या या टी-२० मध्ये एकूण ४२८ धावा झाल्या होत्या.
-
रोहित शर्मा पुन्हा टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (५) ठोकण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. तो सूर्यकुमार यादव (४) आणि ग्लेन मॅक्सवेल (४) यांच्यापेक्षा एक शतक पुढे आहे.
-
या सामन्यात रोहित आणि रिंकूमध्ये १९० धावांची भागीदारी झाली होती. टी-२० आंतरराष्ट्रीय मधली ही भारताची सर्वात मोठी भागीदारी आहे. यापूर्वी दीपक हुडा आणि संजू सॅमसन यांच्यात २०२२ मध्ये आयर्लंडविरुद्ध १७६ धावांची भागीदारी झाली होती.
-
या सामन्यात भारताने शेवटच्या दोन षटकात ५८ धावा केल्या. टी-२० क्रिकेटमध्ये १९व्या-२०व्या षटकांत सर्वाधिक धावा करण्याचा हा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या (५५) नावावर होता.
-
या सामन्यात शेवटच्या षटकांत ३६ धावा झाल्या. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका षटकात ३६ धावा करण्याची ही चौथी वेळ आहे. आजपर्यंत एका षटकात ३६ पेक्षा जास्त धावा झाल्या नाहीत.
-
या सामन्यात शेवटच्या ५ षटकात १०३ धावा झाल्या. १६व्या ते २०व्या षटकांपर्यंत सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत ही दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यामध्ये नेपाळ (१०८) पहिल्या क्रमांकावर आहे. (Photo Source – BCCI X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”