-
भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे.
-
सचिनने इंग्लंडविरुद्धच्या ३२ सामन्यांच्या ५३ डावांमध्ये २५३५ धावा केल्या आहेत. या काळात त्याची फलंदाजीची सरासरी ५१.७३ होती.
-
भारत-इंग्लंड कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणारा सुनील गावसकर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
-
या अनुभवी खेळाडूने ३८ सामन्यांच्या ६७ डावांमध्ये २४८३ धावा केल्या. येथे गावसकररची फलंदाजीची सरासरी ३८.२० होती.
-
या यादीत विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
त्याने इंग्लंडविरुद्धच्या २८ कसोटी सामन्यांच्या ५० डावांमध्ये ४२.३६ च्या सरासरीने १९९१ धावा केल्या आहेत.
-
टीम इंडियाचा सध्याचा प्रशिक्षक राहुल द्रविड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
-
द्रविडने इंग्लंडविरुद्ध २१ कसोटी सामन्यांच्या ३७ डावांमध्ये १९५० धावा केल्या आहेत. त्याने इंग्लंडविरुद्ध ६०.५३ च्या सरासरीने धावा केल्या.
-
या यादीत पाचव्या क्रमांकावर गुंडप्पा विश्वनाथ या आहे. त्याने इंग्लंडविरुद्धच्या ३० कसोटी सामन्यांच्या ५४ डावांमध्ये ३७.६० च्या सरासरीने १८८० धावा केल्या आहेत. (Photo Source -Indian Express)
Maharashtra Budget 2025 LIVE Updates: ‘लाडकी बहीण योजने’चे पैसे १५०० वरून वाढणार कधी? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…