-
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे वैवाहिक जीवन संपुष्टात आले आहे. मागच्या अनेक दिवसांपासून तिच्या व पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक यांच्या घटस्फोटाच्या चर्चा होत्या. (फोटो – सानिया मिर्झा इन्स्टाग्राम)
-
४२ वर्षांच्या शोएब मलिकने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदशी लग्न केलं आहे. त्याने फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (फोटो – शोएब मलिक इन्स्टाग्राम)
-
सना व शोएबच्या लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर सानिया व शोएबच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब झालं आहे. (फोटो – शोएब मलिक इन्स्टाग्राम)
-
शोएब मलिकने जिच्याशी लग्न केलं ती सना जावेद नेमकी कोण आहे ते जाणून घेऊयात.
-
शोएब मलिकची तिसरी पत्नी सना ही ३० वर्षांची आहे.
-
सनाने मॉडेलिंग करत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
-
सना जावेद ही लोकप्रिय पाकिस्तानी अभिनेत्री आहे.
-
सनाने २०१२ मध्ये शहर-ए-जात मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. यानंतर ती अनेक मालिकांमध्ये झळकली.
-
‘खानी’ या रोमँटिक ड्रामामध्ये मुख्य भूमिका साकारल्यानंतर सनाला खूप लोकप्रियता मिळाली.
-
यासाठी तिला लक्स स्टाइल अवॉर्ड्ससाठीही नामांकन मिळाले होते.
-
रिपोर्ट्सनुसार, सना जावेदचं यापूर्वी एक लग्न झालं होतं.
-
सना जावेदने २०२० मध्ये गायक उमेर जसवालशी लग्न केलं होतं.
-
त्यांनी कराचीमध्ये लग्न केलं होतं. ते पाकिस्तानी सिनेइंडस्ट्रीत लोकप्रिय जोडप्यांपैकी एक होते.
-
पण सना-उमेरचं नातं फार काळ टिकू शकलं नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला.
-
उमेर जसवालपासून घटस्फोट घेतल्यानंतर पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदने त्याच्याबरोबरचे सर्व फोटो सोशल मीडियावरून डिलीट केले होते.
-
सनाची ‘प्यारे अफजल’ ही मालिकाची खूप गाजली होती.
-
शोएब मलिक आणि सना जावेद डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या.
-
पण शोएबने लग्नाचे फोटो शेअर केल्यानंतर या केवळ अफवा नव्हत्या, यावर शिक्कामोर्तब झालं आहे.
-
सना ही शोएबची तिसरी पत्नी आहे. त्याचं पहिलं लग्न आयेशा सिद्दीकीशी, दुसरं लग्न सानिया मिर्झाशी झालं होतं.
-
लग्नानंतर सनाने इन्स्टाग्रामवर तिचं नाव बदलून सना शोएब मलिक असं केलं आहे.
-
(सना जावेदचे सर्व फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरून साभार)

Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”