-
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकने पुन्हा लग्न केले आहे. स्वत: शोएबने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेदसह लग्नाची पोस्ट करून पुष्टी केली.
-
ही घटना अशावेळी घडली जेव्हा शोएब आणि सानिया यांच्यात घटस्फोटाच्या बातम्या येत होत्या. एका समारंभात शोएब आणि सना यांचा विवाह झाला.
-
पाकिस्तानच्या प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक सना जावेदचा घटस्फोट झाला आहे. तिने २०२० मध्ये उमेर जसवालशी लग्न केले होते.
-
मात्र, दोघे लवकरच वेगळे झाले. त्यानंतर दोघांनीही आपापल्या अकाऊंटवरून एकमेकांचे फोटो डिलीट केले.
-
त्यानंतर दोघांमध्ये घटस्फोटाचे प्रकरण समोर आले होते. २८ वर्षीय सना पाकिस्तानच्या अनेक टीव्ही शोमध्ये दिसली आहे.
-
शोएब आणि सना यांच्या डेटिंगच्या बातम्या फार पूर्वीपासूनच येत होत्या. शोएबनेही अलीकडेच सनाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
-
शोएबने लिहिले होते- हॅपी बर्थडे बडी! यासोबतच पाकिस्तानी क्रिकेटरने सनाबरोबरचा एक फोटोही शेअर केला होता. (Photo Source – Sana Javed Insta)

Video : शेतकऱ्यांसाठी बेस्ट जुगाड! पोती उचलायला मजूर नाही? तर ही भन्नाट युक्ती वापरून पाहा, व्हिडीओ होतोय व्हायरल