-
भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा ही शोएब मलिकच्या लग्नामुळे पुन्हा चर्चेत आली आहे. कारण तिचा पती शोएब मलिकने तिसरं लग्न केलं आहे. (सर्व फोटो-सानिया मिर्झा-फेसबुक पेज)
-
सानिया मिर्झा ही भारताची स्टार टेनिसस्टार आहे. मात्र ती अनेकदा वादांमध्येही सापडली आहे.
-
सानिया मिर्झा शॉर्ट स्कर्टमध्ये जेव्हा खेळायची तेव्हा तिच्यावर टीका झाली होती आणि तिच्या शॉर्ट स्कर्टवरुन वादही रंगला होता.
-
सानिया मिर्झाने २०१० मध्ये शोएब मलिकशी लग्न केलं. त्यावेळीही तिने पाकिस्तानी क्रिकेटरशी लग्न केल्याने तिला ट्रोलिंग सहन करावं लागलं होतं. तसंच लोकांनी तिच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती.
-
२००७ मध्ये सानिया मिर्झावर धार्मिक भावना दुखावल्याचाही आरोप झाला होता.
-
२००८ मध्ये सानिया मिर्झाने भारतीय राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप तिच्यावर झाला होता. त्यामुळे तिच्यावर टीका झाली होती.
-
सानिया मिर्झा सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय आहे. ती अनेक फोटो पोस्ट करत असते. तिने शॉर्ट ड्रेसमधले फोटो पोस्ट केले की तिला ट्रोल केलं जातं.
-
सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक स्टेटस ठेवलं होतं त्याचीही खूप चर्चा झाली होती.
-
आज शोएब मलिकचे तिसऱ्या लग्नाचे फोटो समोर आल्याने या दोघांचा तलाक झाला आहे का? याची चर्चा सुरु झाली. मात्र सानियाची वडिलांनी हा खुला असल्याचं म्हटलं आहे.
-
सानिया मिर्झाचा ‘खुला’ झाला आहे. खुला या शब्दाचा इस्लाममध्ये अर्थ स्त्रीने पुरुषाला घटस्फोट किंवा काडीमोड देणे. पुरुषाने जर काडीमोड दिला तर त्याला तलाक दिला असं म्हटलं जातं. स्त्रीने काडीमोड दिला तर त्याला खुला म्हटलं जातं.

‘छावा’च्या कलेक्शनमध्ये ९ व्या दिवशी मोठी वाढ! दुसऱ्या शनिवारी कमावले तब्बल…; ‘या’ ३ शहरांमध्ये सर्वाधिक कमाई