-
अयोध्यानगरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्यानंतर झालेल्या सोहळ्यात पंतप्रधान मोदींनी आपले विचार प्रकट केले.
-
प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तर बनले तर पुढे काय? असा प्रश्न मोदींनी उपस्थित केला आणि पुढील हजार वर्ष भारतावर परिणाम करेल, असे कार्य आता करायचे आहे, असे सुतोवाच त्यांनी केले.
-
प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी अनेक आजी-माजी खेळाडूंना निमंत्रण देण्यात आले होते. त्याचबरोबर या सोहळ्याला कोण-कोण उपस्थित होते जाणून घेऊया.
-
व्यंकटेश प्रसाद बराच वेळ या क्षणाची वाट पाहत होते. त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला आणि सोहळ्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर केले.
-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकरही या सोहळ्यात सहभागी झाला होता. तो सोमवारी सकाळी मुंबईहून रवाना झाला होता.
-
माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेही पत्नीसह अभिषेक सोहळ्याला उपस्थित होता. आपला फोटो शेअर करताना त्याने लिहिले की, या पवित्र सोहळ्याचा भाग बनून खूप आनंद होत आहे.
-
भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज देखील सहभागी झाली होती. तिने या सोहळ्याती फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
-
बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनेही या कार्यक्रमाला हजेरी लावली. यावेळी ती म्हणाली, मला वाटते की मी येथे येऊ शकले हे माझे भाग्य आहे. (Photo Source -Social Media X)

लग्नानंतर अडीच वर्षांनी दिली गुडन्यूज! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलणार; डोहाळेजेवणाचे फोटो आले समोर