-
यशस्वी जैस्वालने विशाखापट्टणममध्ये इंग्लंडच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. या सामन्यात त्याने शानदार षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. यशस्वीच्या आधीही भारताच्या अनेक दिग्गज फलंदाजांनी षटकारांसह आंतरराष्ट्रीय शतके पूर्ण केली आहेत.
-
भारतीय संघाचा कर्णधार आणि हिटमॅन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेला रोहित शर्मा त्याच्या गगनाला भिडणाऱ्या षटकारांसाठी ओळखला जातो. आतापर्यंत त्याने कारकिर्दीत तीनवेळा षटकारांसह शतक झळकावले आहे.
-
या यादीत भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलचाही समावेश आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत त्याने दोनदा षटकार मारून आंतरराष्ट्रीय शतक झळकावले होते.
-
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा भारताचा माजी फलंदाज सचिन तेंडुलकरने आपल्या कारकिर्दीत ६ वेळा षटकारांसह आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे.
-
भारतीय संघाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतनेही आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत षटकारासह एक शतक पूर्ण केले आहे.
-
भारतीय संघाचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकदा षटकार ठोकून शतक झळकावले आहे.
-
वीरेंद्र सेहवागचा सलामीचा जोडीदार असलेल्या गौतम गंभीरने कारकिर्दीत दोनदा षटकार ठोकून शतक पूर्ण केले होते. (Photo Source -X)

२३ फेब्रुवारी पंचांग: मेष, कन्या राशीचा रविवार जाणार आनंदात; तुमच्या नशिबात कोणत्या मार्गे येणार सुख? वाचा राशिभविष्य