-
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या टीम इंडियाने ३९६ धावा केल्या.
-
भारताकडून सलामीवीर यशस्वी जैस्वालने २०९ धावांची खेळी केली. यशस्वी जैस्वालशिवाय टीम इंडियाच्या बाकीच्या फलंदाजांनी पहिल्या डावात निराशा केली.
-
इंग्लंडकडून जिमी अँडरसन, शोएब बशीर आणि रेहान अहमद यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.भारताच्या ३९६ धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडचा पहिला डाव २५३ धावांवर आटोपला.
-
इंग्लंडकडून सलामीवीर झॅक क्रॉऊलीने सर्वाधिक ७६ धावांची खेळी खेळली. भारताकडून जसप्रीत बुमराहने ६ विकेट घेतल्या. कुलदीप यादवला ३ बळी घेतले.
-
भारतीय संघाला पहिल्या डावात १४३ धावांची भक्कम आघाडी मिळाली होती. त्यानंतर टीम इंडियाने दुसऱ्या डावात २५५ धावा केल्या.
-
शुबमन गिलने शानदार शतकी खेळी साकारली. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ २९२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला.
-
शुबमन गिलने शानदार शतकी खेळी साकारली. इंग्लंडकडून टॉम हार्टलेने सर्वाधिक ४ विकेट घेतल्या. ३९९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील इंग्लंडचा संघ २९२ धावांपर्यंतच मर्यादित राहिला. (Photo Source – BCCI X)
Rohit Sharma on ODI Retirement: “मी वनडे क्रिकेटमधून निवृत्त…”, रोहित शर्माचं निवृत्तीच्या अफवांवर मोठं वक्तव्य, म्हणाला, “भविष्यातील प्लॅन…”