-
राजकोट कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली. ३३ धावांवर भारताचे तीन फलंदाज पॅव्हेलियनमध्ये गेले होते. (Photo Source – BCCI X)
-
मात्र यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांच्यात शानदार भागीदारी केली. रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजाने पहिल्या डावात शतके झळकावली. (Photo Source – BCCI X)
-
ज्याच्या जोरावर भारतीय संघ ४४५ धावांपर्यंत मजल मारू शकला. प्रत्युत्तरात इंग्लंडचा संघ अवघ्या ३१९ धावांवर गारद झाला. (Photo Source – BCCI X)
-
पहिल्या डावात रवींद्र जडेजाने २२५ चेंडूत ११२ धावांची खेळी केली. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि २ षटकार मारले. (Photo Source – BCCI X)
-
यानंतर रवींद्र जडेजाने गोलंदाजीत आपली ताकद दाखवली. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात रवींद्र जडेजाने १२.४ षटकात ४१ धावा देत ५ फलंदाजांना बाद केले. (Photo Source – BCCI X)
-
रवींद्र जडेजाने पहिल्या डावात २ बळी घेतले होते. अशाप्रकारे फलंदाजीत शतक झळकावल्यानंतर या अष्टपैलू खेळाडूने गोलंदाजीत ७ विकेट्स घेतल्या. (PHOTO – Rivaba Jadeja Insta)
-
उत्कृष्ट कामगिरीसाठी रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. यानंतर रवींद्र जडेजाने आपला सामनावीराचा पुरस्कार पत्नी रिवाबा जडेजाला समर्पित केला. (PHOTO – Rivaba Jadeja Insta)
IND vs PAK: “अरे ए…”, रोहित शर्माचा मेसेज आणि विराटने चौकारासह शतक केलं पूर्ण; शतकानंतर कोहलीने दिली अशी प्रतिक्रिया…पाहा VIDEO