-
राजकोट कसोटीदरम्यान सर्फराझ खानने पदार्पण केले. त्याने रांचीमध्ये तो १४ आणि ९ च्या धावसंख्येवर बाद झाला. यानंतर आता कर्णधार रोहित शर्माने धरमशालामध्ये सर्फराझशी २० मिनिटे चर्चा करुव त्याला गुरुमंत्र दिला.
-
या मालिकेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या कुलदीप यादवनेही नेटमध्ये बराच वेळ गोलंदाजी केली. धर्मशालामध्ये वेगवान गोलंदाजांना मदत मिळणार असल्याचे वृत्त असल्याने आता कुलदीपला खेळण्याची संधी मिळते की नाही हे पाहायचे आहे.
-
कर्नाटकचा डावखुरा फलंदाज देवदत्त पडिक्कल आतापर्यंत एकही कसोटी सामना खेळू शकलेला नाही. रजत पाटीदारचा खराब फॉर्म पाहता पडिक्कलला कसोटीत पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
भारतीय संघ मालिकेत ३-१ ने आघाडीवर असून शेवटची कसोटी जिंकण्यावरही त्याची नजर आहे. सराव सत्रादरम्यान कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन बराच वेळ गप्पा मारताना दिसले.
-
जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपने रांचीमध्ये पदार्पण केले. मुकेशला संघात ठेवण्यात आले असून मुकेशनेही बराच वेळ नेटमध्ये गोलंदाजी केली.
-
प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघातील युवा खेळाडूंची संख्या आधीच वाढली आहे. ध्रुव जुरेल, देवदत्त पडिक्कल, आकाश दीप या खेळाडूंनीही खूप नेट सत्रात धमाल केली.
-
धर्मशालामध्ये वेगवान गोलंदाजांची मदत मिळाल्यास जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज पुन्हा दमदार प्रदर्शन करू शकतात. दोन्ही गोलंदाजांनी मिळून आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे.
-
सध्याच्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत यशस्वीने शानदार फलंदाजी केली आहे. त्याने आतापर्यंत ४ कसोटीत ६५५ धावा केल्या असून यशस्वी धर्मशाला येथे अनेक विक्रम मोडू शकतो.
-
भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनचा हा १०० वा कसोटी सामना असेल. १०० कसोटी सामने खेळणारा तो भारताचा १४वा खेळाडू ठरणार आहे. (Photo Source – BCCI X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”