-
गुजरातविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबईची कर्णधार हरमनप्रीत कौरने अवघ्या ४८ चेंडूत नाबाद ९५ धावा केल्या. या खेळीत तिने १० चौकार आणि ५ षटकार मारले. (Photo Source -WPL X)
-
डब्ल्यूपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मुंबई इंडियन्सने केला. हरमनप्रीत कौरने अमेलिया केरसोबत चौथ्या विकेटसाठी ९७ धावांची भागीदारी केली. (Photo Source -WPL X)
-
यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गेल्या मोसमात मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर जायंट्सविरुद्ध १८९ धावांचा पाठलाग करून हा विक्रम आपल्या नावावर केला होता. (Photo Source -WPL X)
-
हरमनप्रीतने डब्ल्यूपीएलमध्ये मुंबईकडून सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्याचा विक्रम केला. तिने हेली मॅथ्यूजचा विक्रम मोडला. मॅथ्यूजने गेल्या मोसमात मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर आरसीबीविरुद्ध ३८ चेंडूत ७७ धावा केल्या होत्या. (Photo Source -WPL X)
-
सोफी डिव्हाइनच्या ९९ धावा (२०२३ मध्ये जायंट्स विरुद्ध) आणि एलिसा हेलीच्याच्या ९६* धावा (२०२३ मध्ये आरसीबी विरुद्ध) नंतर हरमनप्रीतच्या ९५ धावा ही डब्ल्यूपीएलमधील तिसरी सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. (Photo Source -WPL X)
-
हरमनप्रीतने डब्ल्यूपीएल इतिहासात भारतीयाकडून सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्येचा विक्रमही केला. तिने स्मृती मंधानाच्या यूपी वॉरियर्सविरुद्ध च्या ८० धावांचा विक्रम मोडला. (Photo Source -WPL X)
-
मुंबई इंडियन्सने डब्ल्यूपीएल सामन्याच्या शेवटच्या ६ षटकांमध्ये सर्वाधिक ९१ धावा करण्याचा विक्रम केला. त्यांच्या फलंदाजांनी अखेरच्या षटकांमध्ये तुफानी फलंदाजी करत संघाला विजयापर्यंत नेले. (Photo Source -WPL X)
-
डब्ल्यूपीएलमध्ये ५०० धावांचा टप्पा गाठणारी हरमनप्रीत कौर पहिली भारतीय ठरली. दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंगने पहिल्या सत्रात ही कामगिरी केल्यानंतर, ती अशी कामगिरी करणारी एकूण दुसरी खेळाडू ठरली. (Photo Source -WPL X)
-
९ मार्च रोजी डब्ल्यूपीएलमध्ये मुंबई इंडियन्सने गुजरात जायंट्सचा 7 गडी राखून पराभव केला. या विजयासह प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे. (Photo Source -WPL X)

Chhaava: मकरंद अनासपुरे ‘छावा’ पाहिल्यावर म्हणाले, “इतिहासाची मोडतोड…”