-
रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना आज मुंबईच्या वणखेडे स्टेडियमवर पर पडला. या अंतिम सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा १६९ धावांनी पराभव केला. मात्र विदर्भाच्या कर्णधाराने केलेली कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. (फोटो: टीम इंडिया अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
विदर्भाचा कर्णधार अक्षय वाडकरने मुंबई विरुद्धच्या रणजी ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करून अनेकांच लक्ष वेधून घेतल आहे. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
सामन्यात अक्षय वाडकरने मुंबई विरुद्ध आपला शतक पूर्ण केला. आपल्या सामन्यातील कामगिरीसाठी अक्षयची सर्वत्र चर्चा सुरू आहे जाणून घेऊया अक्षय वाडकरच्या करकीर्दी बद्दल. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
वानखेडे स्टेडियमवर अंतिम सामन्याच्या 5 व्या दिवशी अक्षयने आपला शतक पूर्ण केला. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
अक्षय वाडकरने 2012-13 च्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये विदर्भासाठी व्यावसायिक पदार्पण केले होते. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
2017-18 दरम्यान वाडकरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करून रणजीमध्ये 61.60 च्या सरासरीने 308 धावा केल्या. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
29 वर्षीय वाडकरने 50 एफसी सामने खेळले आहेत ज्यामध्ये 49.77 च्या सरासरीने त्याने 8 शतक आणि 17 अर्धशतकांसह 3036 धावा केल्या आहेत. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
रणजीट्रॉफीच्या दुसरा सीझनमध्ये आपल्या उत्कृष्ट कामगिरीने त्याने केवळ 11 सामन्यांमध्ये 60.41 च्या सरासरीने 725 धावा पूर्ण केल्या होत्या. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
अक्षयने या मालिकेत 3 शतके आणि 2 अर्धशतकांची नोंद देखील केली आणि विदर्भ संघाने रणजी विजेतेपद पटकावले. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)
-
अक्षय वाडकरला एकदा वसीम जाफरने इंग्लंडला जाण्याची संधि दिली होती, परंतु वाडकरने ती संधि नाकारली कारण अक्षयला आपले सराव भारतातच करायचे होते आणि एक उतकृष्ट फलंदाज बनायचा होतं. (फोटो: अक्षय वाडकर अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंट)

होळीनंतर या तीन राशींचे चमकणार सोन्यासारखे नशीब, बँक बॅलेन्समध्ये वाढणार, मिळेल अपार पैसा संपत्ती